शेतकऱ्याला मारहाण प्रकरण पवन चक्कीचा वाद चव्हाट्यावर;अखेर पवनचक्की कंपनीसह १३ जणांवर गुन्हा दाखल
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर तालुक्यातील बारुळ येथील ऐका पवनचक्की कंपनीच्या विरोधात १३ जणांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला असून अतिक्रमण तसेच रोडने मारहाण करून जखमी केले व जीवे ठार मारण्याची धमकी दिली या प्रकरणी तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून तुळजापूर पोलीस स्टेशन येथे दिनांक 25 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे . याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार तुळजापूर तालुक्यातील बारूळ येथे दिनांक 14 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या शेतामध्ये फिर्यादीचे आईने पवनचक्की कंपनीला पवनचक्की साठी गट नंबर 81 मधील 20 गुंठे जमीन भाडेतत्त्वावर दिलेली आहे .पवनचक्कीचे लोक वीस गुंठे जमीन न वापरता तीस ते पस्तीस गुंठे जमिनीवर अतिक्रमण करून मोठमोठ्या पवनचक्क्या गाड्या फिर्यादींच्या शेतातून घेऊन जातात .फिर्यादीचे शेतातील लिंबाची,बाभळीचे,बोरीचे झाडे हे देखील आरोपीने कुठलीही परवानगी न घेता तोडत असताना फिर्यादीने झाडे तोडू नका असे विनंती आरोपींना केली असता आरोपीने फिर्यादी यांना आम्ही जमीन विकत घेतली आहे आम्ही काय करूतुला काय करायचे आहे असे म्हणून फिर्यादीच्या डोक्यात रॉड घालून जखमी केले तसेच इतर आरोपीने शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली . अशा प्रकारची फिर्याद सचिन प्रभाकर ठोंबरे वय 32 वर्ष व्यवसाय शेती राहणार बारूळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून पवनचक्की कंपनीचे दादा पवार,अंकित मिश्रा,वैभव कदम,व इतर पाच ते सात लोक असे मिळून एकूण 13 जणांवर तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 587/2024 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 118(1)191(2)191(3)190,352,351(2)(3)नुसार गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भालेराव हे करत आहेत .