नाताळच्या सुट्ट्या नवीन वर्ष तसेच लग्नसराईमुळे तुळजाभवानीचं दर्शन आता 22 तास राहणार खुले !
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
नाताळच्या सुट्ट्या नवीन वर्ष तसेच लग्नसराईमुळे तुळजाभवानी मंदिरात भाविकांची गर्दी होत आहे. त्यामुळे आजपासून पुढील आठ दिवस म्हणजेच एक डिसेंबर पर्यंत मंदिर 22 तास खुले ठेवण्याचा निर्णय प्रशासनाला घेतला आहे. 25 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत मंदिर पहाटे एक वाजता चरणतीर्थ पूजा होऊन भविकासाठी खुले करण्यात येणार, तर रात्री साडेदहाच्या सुमारास प्रक्षाळ पूजेनंतर मंदिर बंद करण्यात येणार आहे. मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक तहसीलदार माया माने यांनी तसे आदेश काढलेत.नाताळ, नवीन वर्ष, आणि लग्नसराईमुळे मोठ्या प्रमाणावर लोक तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येतात. राज्यासह परराज्यातूनही तुळजाभवानीच्या चरणी आशिर्वाद घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करण्यसाठी भाविकांची गर्दी झाल्याचं दिसत आहे. परंपरा आहे. त्यामुळे मंदिर परिसरात सध्या भक्तांची विशेष गर्दी होत आहे.