लम्पी आजाराने दगावत आहेत जनावरे,धाराशिव तालुक्यातील बावी येथे एक जनावर दगावले
तुळजापूर : प्रतिनिधी
धाराशिव तालुक्यातील बावी – कावलदरा परिसरात लम्पी आजाराने दगावत आहेत जनावरे,धाराशिव तालुक्यातील बावी येथे एक जनावर दगावले एक गाय सध्या धरलेला पडलेले आहे आता उन्हात शेतकरी वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र गाईने धरणी धरलेले आहे.अनेक जनावरांना या आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शेतकऱ्यांनी जीवापाड जोपासलेली जनावरे लम्पी स्कीन आजारामुळे एका जनावराचा मृत्यू तर एक जनावर गंभिर जख्मी. त्याची भरपाई तातडीने प्रशासनाने द्यावी, अशी मागणी ग्रामीण भागातून पशुपालकातून होत आहे. पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी तातडीने लसीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.