छत्रपती शिवाजीमहाराज चौकात हायमास्ट बसवावे – शहराध्यक्ष महेश चोपदार
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तीर्थक्षेत्र तुळजापूरातील पथदिवे बंद असल्याने शहरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हायमास्ट बसवण्याची मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष महेश चोपदार यांनी दि.२४ डिसेंबर रोजी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे निवेदनाद्वार मागणी केली आहे. या शिवाय तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी समर्थ असलेले भूमिअभिलेख कार्यालय व महावितरण कार्यालयातील भोंगळ कारभारा सुधारण्याची मागणी करण्यात आली आहे. आमदार पाटील यांचा जनता दरबारात राष्ट्रवादी- अजित पवार गटाचे शहराध्यक्ष महेश चोपदार व दत्तात्रय हुंडेकरी यांनी मागण्यांचे निवेदन दिले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक हा एन्ट्री पॉइंट असून, चौकातून, हजारो वाहने ये-जा करत असतात. परंतु नव्याने नूतनीकरण व सुशोभीकरण करून बसवण्यात आलेला देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येणाऱ्या भक्तांना रात्रीच्या वेळेस अंधार असल्यामुळे दिसत नाही. तरी आमदार निधीतून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हायमास्ट बसवण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना शहराध्यक्ष महेश चोपदार व दत्तात्रय हुंडेकरी , आंबादास कदम, गणेश गिरी, सुभाष कदम आदि उपस्थित होते.
