अमित शहाच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तुळजापूरच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये देशाचा गृहमंत्री तडीपार अमित शहा यांने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आंबेडकर आंबेडकर आंबेडकर असे म्हणण्यापेक्षा देवी देवतांचे नाव घेतला असता तर तुम्ही साथ जन्म स्वर्गात गेला असता असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला आहे अरे तेंव्हाच बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला त्या नरकातून काढून स्वर्गात आणण्याचे काम केला आहे ज्या कुणाला देवदेवताचं नाव घ्यायचं आहे त्यांनी नाव घेऊन खुशाल स्वर्गात जाव आमची काहीच हरकत नाही तसेच तडीपार अमित शहा यांनी देशाची माफी मागावी व मंत्री पदाचा राजीनामा द्यावा म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तुळजापूरच्या वतीने आंबेडकर चौक ते तहसील कार्यालयासमोर मोर्चा काढून जोरदार निदर्शने करण्यात आली त्याचबरोबर परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ राज्यघटनेच्या शिल्पाचे मोडतोड एका हरामखोराने केली त्याच्या निषेधार्थ आंबेडकरी चळवळीतील आंबेडकरी सर्व पक्ष संघटनांनी मिळून निषेध व्यक्त केला बंद ठेवण्यचा प्रयत्न करण्यात आला त्यानंतर तेथील स्थानिक पोलिसांनी कोबिंग ऑपरेशन करून भीम नगर व दलित वास्तामध्ये घुसून दलित जनतेच्या वाहनांची मोडतोड करून निरापराध लोकांना उचलून पोलिस कोठडीमध्ये मध्ये टाकून भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यात अमानुषपणे मारहाण करून त्याचा खून करण्यात आला सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेले येथील पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी व मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला 25 लाख रुपयाचे अर्थसाहाय्य शासनाकडून देण्यात यावे व त्यांच्या कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्यात यावे त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घ्यावे यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तहसीलदार तुळजापूर यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे धाराशिव जिल्हा समन्वयक तानाजी कदम विधानसभा अध्यक्ष प्रकाश कदम शहराध्यक्ष अरुण कदम युवक शहराध्यक्ष अमोल कदम युवक सरचिटणीस आतिश कदम कामगार आघाडी तालुकाध्यक्ष आप्पा कदम कामगार आघाडी शहराध्यक्ष रवि वाघमारे शहर उपाध्यक्ष वैजनाथ पांडागळे प्राध्यापक अशोक कांबळे, तालुका उपाध्यक्ष किसन पांडागळे बसवंत जाधव दाजी माने वडार समाजाचे बाळू शिंदे महादेव सोनवणे तानाजी डावरे विजय गायकवाड सुरेश चौधरी ज्ञानदेव शिंदे मुकेश चौधरी बाळासाहेब कदम विकास चौधरी विनोद भालेकर रामचंद्र गवळी आतिश जवळगेकर दिलीप मावळे दिलीप हावळे धनंजय कदम धनंजय कदम रवींद्र कदम लिंबाजी कदम भागवत कदम संजय गायकवाड रमेश गायकवाड बाबा मस्के विलास सरवदे इत्यादीसह शेकडो भीमसैनिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते

