फिल्मी स्टाईलने टाकला दरोडा ;दरोड्यातील माल २४ तासामध्ये पोलिसानी २,कोटी २१,३१,८७१ लाखासह एक आरोपी घेतला ताब्यात.

फिल्मी स्टाईलने टाकला दरोड ;२४ तासामध्ये एकुण २,कोटी २१,३१,८७१ लाखासह एक आरोपी ताब्यात.

गुन्ह्यातील अन्ये आरोपी पोलीस शोध घेत आहेत !

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग ते तुळजापूर जाणारे रोडवर गंधोरा पाटीच्या पुढे आले असता पाच अनोळखी इसमांनी देवेद्र शेडुळे यांचा नमूद ट्रक थांबवून,फिल्मी स्टाईलने टाकला होता दरोडा..दुबलगुंडी, ता.हुमनाबाद, जि. बिदर राज्य- कर्नाटक येथील- देवेंद्र रेवणप्पा शेडुळे, वय ४० वर्षे, याने हा ट्रक क्र.ए.पी.५६-४३८० हैद्राबाद ते शिलवासा असा प्रवास करत असताना दि.१७ डिसेंबर २०२४ रोजी ५.०० वाजन्याच्या सुमारास तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग ते तुळजापूर कडे जाणारे रोडवर गंधोरा पाटीच्या पुढे आले असता पाच अनोळखी इसमांनी देवेद्र शेडुळे यांचा ट्रक थांबवून,आम्ही फायनान्स कंपनी कडून आलो आहोत तुमच्या ट्रकचे दोन हाफ्ते भरायचे बाकी आहेत असे त्यांना म्हणाले असता.देवेंद्र शेडुळे यांनी ट्रक रस्त्याबाजूस थांबवला असता एका अनोळखी इसमांसह अन्य चार इसमांनी देवेंद्र शेडुळे व त्यांचा भाच्चा यांना लाथाबुक्यांनी मारहाण करुन बळजबरीने त्यांच्या कार मध्ये बसवून चाकुचा धाक दाखवून देवेंद्र शेडुळे यांची ट्रक क्र.ए.पी. ५६-४३८०, कॉप्रचे रॉड २४ टन ७७० किलो वजनाचा व तीन मोबाईल फोन असे बळजबरीने घेवून तेथून फिल्मी स्टाईलने पसार झाले. यावर देवेंद्र शेडुळे यांनी नळदुर्ग पोलीस ठाणे गाठून गुन्हा क्र.४८०/२०२४ हा भा.न्या.सं. कलम-३१०(२),१२६(२) हा गुन्हा रात्री ०५:१७ वा.सु.नोंदवला आहे.गुन्हा तपासादरम्यान पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सरोदे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सपोनि सुदर्शन कासार,सचिन खटके, अमोल मोरे, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सपोनि- आनंद कांगुणे, पोउपनि- संतोष गिते, पोकॉ-अविनाश दांडेकर, बालाजी शिंदे, सुर्यकांत फुलसुंदर,यांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हावलदार-शौकत पठाण,फराहाण पठाण, जावेद काझी,विनोद जानराव,समाधान वाघमारे,अमोल निबांळकर,पोलीस नाईक-बबन जाधवर,नितीन जाधवर पोकॉ- योगेश कोळी,चालक हावलदार विजय घुगे,पोकॉ शिंदे यांच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दीच्या व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी- १)इरफान जाकीर शेख, वय २७ वर्षे,रा.पंतगे रोड काळा मठ उमरगा ता.उमरगा जि.धाराशिव यास दि.१८ डिसेंबर २०२४ रोजी लातुर रोड उमरगा चौरस्ता येथुन ताब्यात घेवून लुटीतील नमुद ट्रक,२४ टन ७७० किलो वजनाचा कॉपरचा माल असा एकुण २,२१,३१,८७१ ₹ जप्त केले आहेत.गुन्ह्यातील उर्वरीत आरोपीनांचा पोलीस प्रशासन शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!