श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थान ऑनलाईन सिंहासन पुजा नोंदणी करण्याचे आवाहन

                                                                                                       श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थान ऑनलाईन सिंहासन पुजा नोंदणी करण्याचे आवाहन

तुळजापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी देविजींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश,कर्नाटक, तेलंगना व इतर राज्यातून भाविक कुलदेवता असल्याने या ठिकाणी कुलाचार व कुलधर्म करण्यासाठी मोठ्या संख्येने भक्तिभावाने येतात.श्री देविजीची सिंहासन पुजा ही अत्यंत महत्वाची मानली जाते.ही सिंहासन पुजा नोंदणी ऑनलाईन पध्दतीने श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर https://shrituljabhavani.org उपलब्ध करून देण्यात येणार आहे.जानेवारी २०२५ मधील सिंहासन पुजा ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येईल याची सर्व भाविक भक्त,महंत,पुजारी,सेवेकरी व नागरीकांनी नोंद घ्यावी.भाविकांनी सिंहासन पुजा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकृत संकेतस्थळ https://shrituljabhavani.org यावरून सिंहासन पुजा बुकींग या मेन्युवर क्लिक केल्यानंतर https://shrituljabhavanimataseva. org या लिंकवर प्रवेश करून भाविकांनी आपली सिंहासन पुजा ची नोंदणी करावी सिंहासन पुजा नोंदणी २१ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजतापासून सुरू होईल.ती २६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजतापर्यंत करता येईल.ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने प्रथम सोडत व भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस २७ डिसेंबर २०२४ रोजी १०.३० वाजता पाठविण्यात येतील.भाविकांनी प्रथम सोडतीचे ऑनलाईन पेमेंट २७ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजतापासून ते २८ डिसेंबरपर्यंत सकाळी १० वाजतापर्यंत करावे.सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पद्धतीने व्दितीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी २८ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजेपर्यंत एसएमएस पाठविण्यात येतील.भाविकांनी व्दितीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट २८ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते २९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत करावे.प्रथम व व्दितीय फेरीत सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने तृतीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी २९ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजतापर्यंत एमएमएस पाठविण्यात येतील.भाविकांनी तृतीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट २९ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते ३० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजतापर्यंत करावे.माहे जानेवारी -२०२५ या महिन्यातील अंतीम सिंहासन पुजा बुकींग झाल्याची यादी ३० डिसेंबर रोजी ५ वाजेपर्यंत प्रसिध्द करण्यात येईल.भाविकांनी वरीलप्रमाणे सिंहासन पुजा नोंदणीचा लाभ घ्यावा.असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर, संस्थान तुळजापूर तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!