संतोष देशमुख यांच्या खुण प्रकरणाचा तपास जलद गतीने करावा उपविभागीय अधिकारीयांच्याकडील निवेदनाद्वारे मागणी
भूम : औदुंबर जाधव
भुम येथील उपविभागीय अधिकारी यांना दि.१३ डिसेंबर रोजीसक्रीय मराठा अंदोलक संतोष पंडीतराव देशमुख निर्घुन खुण प्रकरणाचा तपास जलद गतीने करुन प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सर्व संबंधीत आरोपीना अटक करुन कठोर शासन करावे असे निवेदन देण्यात आले निवेदनात असे नमूद केले आहे की संतोष पंडीतराव देशमुख रा. मस्साजोग ता. केज जि. बीड यांचा दि. ०९/१२/२०२४ रोजी अपहरण करुन निघृणपणे खुण करण्यात आला आहे. त्यामुळे नागरीकांमधुन तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असुन नागरीकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीच्या अटकेसाठी ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलने करण्यात येत आहेत. संतोष पंडीतराव देशमुख मस्साजोग गावचे सरपंच होते, सदर घडलेला प्रकार अतिशय गंभीर आहे. त्यामुळे सदर प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सर्व संबंधीत आरोपीना अटक करुन कठोर शासन करणे अत्यंत गरजेचे आहे. तरी संतोष पंडीतराव देशमुख यांच्या खुण प्रकरणाचा तपास जलद गतीने करुन प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सर्व संबंधीत आरोपीना अटक करुन कठोर शासन करावे अन्यथा सकल मराठा समजा तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल त्यास सर्वस्वी जिम्मेदार सरकार राहील याची नोंद घ्यावी.असे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले