शेतकऱ्यांना दिवसा लाईट द्या, बिबट्याचा बंदोबस्त करा: ठाकरे सेनेची मागणी
भूम औदुंबर जाधव
तालुक्यात रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, ही पिके जोरात आहेत. रात्रीची लाईट असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. भूम तालुक्यात अनेक दिवसापासून बिबट्या आणी बिबट्या सदृश प्राण्याने दहशत माजवली आहे.मात्रेवाडी शिवारात रात्री शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या विजय सोमनाथ माने या शेतकऱ्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला आहे. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. तसेच तालुक्यात बऱ्याच गावात जनावरांना जखमी केले आहे. तरी जखमी शेतकऱ्याला व जखमी जनावरे यांना शासनामार्फत तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी.तसेच भूम तालुक्यातील शेतातील विद्युत पुरवठा दिवसभर नियमित करून बिबट्याचा बंदोबस्त करावा अन्यथाशिवसेना स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनद्वारे देण्यात आला आहे. निवेदन महाराष्ट्र विद्युत मंडळ व सामाजिक वनिकरण कार्यालयात देण्यात आले. यावेळी खासदार ओमराजे निबाळकर यांनी वन अधिकारी यांच्याशी दुरध्वनी वर संपर्क करून तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करा व शेतकऱ्याला दिवसाची लाईट द्या अशा सूचना केल्या. या निवेदनावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष तालुकाप्रमुख अनिल दादा शेंडगे, शिवसेना जेष्ठ नेते दिलीप शाळू महाराज, युवासेना जिल्हाप्रमुख चेतन बोराडे, माहिला तालुकाध्यक्ष उमादेवी रणदिवे, अजित तांबे, अशोक वणवे, सुनील गपाट, रामभाऊ नलावडे, लह गोरे, साहेबराव डोके, राहुल पवार, दत्तात्रय चंदनशिव, संतोष शेंडगे, सर्फराज कुरेशी आदी शेतकरी व पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.
