त
तुळजापूर तहसील कार्यालय येथे जन्म ,मृत्यू नोंद दाखल्यासाठी नागरिकाची हेळसांड
तुळजापूर : ज्ञानेखर गवळी
तुळजापूर तहसील कार्यालय येथे जन्म ,मृत्यू नोंद दाखला मिळण्यासाठी १५ ते ३० दिवस कालावधी असताना तीन-चार महिने लावत आहेत का ?पंचनामा करण्याकरिता स्व:ता नागरिकांना तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडे हेलपाटे मारावे लागत आहेत.मात्र ठराविक एजंट मार्फत गेल्यास तात्काळ फाईल आठ दिवसाच्या आत निकाली काढतात आणि जन्ममृत्यूचा दाखला तात्काळ देतात या प्रकरणात नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी ,तलाठी आणि एजंट यांच्या संगनमताने नागरिकाची हेळसांड व आर्थिक लूट चालू आहे.यात संबंधित वरिष्ठ अधिकारी लक्ष घालून होणारे आर्थिक लूट थांबवावी अशी नागरिकांतून मागणी होत आहे.
