शासकीय सेवेत कायम करण्याची मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षनार्थीची मागणी
भूम : औदुंबर जाधव
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शाळा, आरोग्य, महसुल ग्रामपंचायत या ठिकाणी गावाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात युवा प्रशिक्षण योजने मार्फत भरती करण्यात आली होती. मात्र हा कालावधी सहा महिन्यांचा होता त्यामुळे आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी यांना प्रशासन मधील बरीच माहीती झाल्याने आमचा कालावधी वाढवुन देण्यात येऊन आम्हाला शासकीय सेवेत कायम करण्यात यावे असे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी भूम यांच्या मार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटना भूम यांच्या वतीने करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत प्रशिक्षण होत असून आता आमचे प्रशिक्षण फेब्रुवारी सन 2024-25 मध्ये पूर्ण होत असून आणि आम्हाला सरकारी कामातील पुरेपूर अनुभव पण आला आहे. तरी आमचा कार्यकाळ संपल्यानंतर सुद्धा आम्हाला कायम रुजू करण्याची कृपा करावी, ही विनंती. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत रुजू झालेली प्रशिक्षणार्थी यांना महागाई भत्ता देण्यात यावा. प्रशिक्षणार्थी यांना 25000 हजार रुपये वेतन देण्यात यावे. प्रशिक्षणार्थी यांचे वेतन महिन्याच्या 5 तारखेला करण्यात यावे. आमचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला प्रमाणपत्र देऊन कोणत्याही अटीशिवाय सरळ सेवा भरतीमध्ये समाविष्ट करावे. पीएफ व ईएसआयसी लागू करावे, पुढील होणाऱ्या सर्व शासकीय भरतीमध्ये 50% आरक्षण देण्यात यावे. निवेदनावर प्रज्ञा मुंडे,नेताजी लहाने, शाम डोके, मयूर कोळी, रंजित मिसाळ, श्वेता भोगील, कोमल गुंजाळ, वैष्णवी भराटे, अपर्णा मोदी, सुधीर मुंढे, विशाल इंदलकर सह आदी प्रशिक्षनार्थीच्या सह्या आहेत.