भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथे पहाटे एका युवकास बिबट्याने केले गंभीर जखमी

भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथे पहाटे एका युवकास बिबट्याने केले गंभीर जखमी

भूम : औदुंबर जाधव

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील मात्रेवाडी येथे पहाटे ४.१५ वा जन्याच्या सुमारास विजय सोमनाथ माने या शेतकऱ्यावर बिबट्यासदृश प्राण्याने हल्ला केला या हल्ल्यात ते जखमी झाले त्यांना तातडीने भूम येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे त्यांच्या प्रकृतीच्यास्थितीची गंभीरता पाहता त्यांना पुढील उपचारासाठी बार्थी येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले आहे ह्या घटनेमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वनविभागाने तातडीने उपाय योजना करणे आवश्यक आहे तसेच शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पावले उचलने गरजेचे आहे तरी शेतकऱ्यांनी रात्री किंवा पहाटे जाण्याचं आवश्यक नसल्यास टाळावे आपल्या जीवापुढे जास्त महत्त्वाचं नाही हे सर्व शेतकऱ्यांनी पहावे विजय माने यांचे सागर माने बंधू सैनिक हे तिथेच जवळच असल्याने हे दोघेही शेतात रात्रीची लाईट असल्याने पाणी देण्यासाठी गेलेले होतेबिबट्याने तीन वेळेस विजय माने यांच्यावर हल्ला केला विजय माने हे ओरडल्याने सागर माने त्यांच्याकडे धावतगेल्याने व बॅटरी चमकवल्याने बिबट्यातिथून निघून गेला त्यामुळे विजय माने त्यांचा जीव वाचला तीन वेळेस बिबट्याने चावा त्यांच्या डाव्या हाताच्या बाजूला व बरगडीत हल्ला केल्याने जास्त जखम झाली असल्यामुळे ऑपरेशन करावे लागेल असे डॉक्टर यांनी सांगितले आहे असे विजय माने यांचे बंधू सागर माने यांनी तुळजापूरनामा न्युज चॅनलशी बोलताना सांगितलेभूम शहराजवळील एमआयडीसी समोरील ओम पिसाळ यांच्या जनावराच्या गोठामधील लहान वासराला खाण्याचा प्रयत्न बिबट्याने केला असल्याचा सध्या तरी दिसत आहे मागील दहा-पंधरा दिवसापासून भूम तालुक्यासह शहराजवळ बिबट्या वावर दिसत असल्याचं नागरिकांमधून बोलले जात आहे. सध्या भूम शहरालगत एमआयडीसी समोर भावषेद बुवा जवळ ओम पिसाळ यांचा जनावराचा गोठा आहे. रात्री ८ वाढदिवसाच्या दरम्यान त्या गोठ्यामधील लहान वासराला विजा करून त्याला खाण्याचा प्रयत्न बिबट्याने केलाअसल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. तरी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आव्हान वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

भास्कर महादेव वारे सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी भूम

वन विभागाने बिबट्या प्राण्याला पिंजरा लावून तात्काळ पकडणे गरजेचे आहे शेतकऱ्यांना ज्वारी हरभरा या पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतामध्ये जावे लागते त्यामुळे महावितरणने शेतावरील विद्युत पंप लाईट टाइमिंग हे दिवसा ठेवणे गरजेचे आहे म्हणजे शेतकऱ्यांना वन्य प्राण्यापासून धोका होणार नाही त्यामुळे महावितरणने दिवसा शेतीसाठी लाईट पुरवणे गरजेचे आहे व शासनाने जखमी झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी भास्कर वारे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!