तुळजापूर येथे ७८ वा होमगार्ड वर्धापनदिन साजरा.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर येथे 78 वा होमगार्ड वर्धापनदिन साजरा धाराशिव जिल्हा समादेशक अधिकारी गौहर हसन व केंद्र नायक कोकरे सुभेदार गोचडे तसेच प्रशासकीय अधिकारी सुखसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आला तालुका समादेशक अधिकारी रणजितसिंह रोकडे यांच्या उपस्थितीतप्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करून विविध कार्यक्रमाने वर्धापनदिन संपन्न झाला दिनांक १२ डिसेबर गुरुवार रोजी तुळजापूर पोलीस स्टेशन आणि उपजिल्हा रुग्णालय येथे स्वच्छता मोहीम करून शहरांमध्ये होमगार्ड रॅली काढण्यात आली तसेच जिल्हा उपजिल्हारुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आली यावेळी तुळजापूर पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर ,उपनिरीक्षक विठ्ठल चासकर यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले यावेळी सर्व होमगार्ड उपस्थित होते

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार फलटण नाईक सोनवणे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी वरिष्ठ फलटण नायक मंडोळे व फलटण नाईक बागवान मॅडम मार्गदर्शन केले.

