भुमिअभिलेख कार्यालयातील प्रकरणात गुंतलेल्यावर कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात यावी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

भुमिअभिलेख कार्यालयातील प्रकरणात गुंतलेल्यावर कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात यावी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

तुळजापूर, : ज्ञानेश्वर गवळी

तुळजापुर येथील न.भु.क्र. ३१९५ मध्ये खाडाखोड करुन चुकीचे क्षेत्र लावले बाबत जिल्हाधिकारी यांना व उप अधीक्षक,भुमि अभिलेख कार्यालय तुळजापुर यांना आम आदमी पार्टीचे तुळजापूर शहराध्यक्ष किरण यादव यांनी निवेदन दिले आहे.निवेदनात असे नमूद केले आहे की, तुळजापूर येथील न.भु.क्र. ३१९५ हा पापनास गृहनिर्माण सोसायटी मधील नसुन सदर नगर भूमापन क्रमांक पापनास गृहनिर्माण सोसायटी मध्ये दाखविलेले आहे. सदर नगर भूमापन क्रमांकाची आपल्या कार्यालयात नगर भूमापन क्रमांक ३१९५ ची मूळ मिळकत पत्रिकेची नक्कल काढली असता असे निदर्शनास येते की, नगर भूमापन क्रमांक ३१९५ मध्ये मुळ क्षेत्र कट करुन दूसरे क्षेत्र टाकण्यात आलेले आहे. तसेच दिनांक २९/१२/१९९२ रोजीची नोद मंजुर झालेली आहे मंजुर झालेनंतर सदर नोंदीच्या खाली इतर हस्ताक्षरामध्ये नोंद घेवुन सदरची नोद मुळ नोंदीमध्ये घालणेचा प्रयत्न केला आहे. आपण जर सदर मिळकत पत्रिकेची पाहणी केली असता सदरच्या बाबी स्पष्टपने दिसुन येतील.तरी सदर नोंदी बाबत व खाडाखोड बाबत आपल्या कार्यालयाकडून सखोल चौकशी करुन सदर नोंदी रद्द करुन या प्रकरणात गुंतलेल्यावर कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात यावी असं एका लेखी निवेदनाद्वारे देण्यात आले आहे. या निवेदनावर आम आदमी पार्टीचे तुळजापूर शहराध्यक्ष किरण यादव यांची स्वाक्षरी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!