देशी विदेशी दारुच्यासीलबंद बाटल्या बेंबळी पोलिसांनी रेड मारून माल घेतल्या ताब्यात
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव तालुक्यातील बेंबळी पोलीस ठाणे हद्दीतील आरोपी रेश्मा आयरिंग भोसले, वय 35 वर्षे, रा. डिकमल पारधी वस्ती तुळजापूर खुर्द ता.तुळजापूर ह.मु. धारुर ता.जि धाराशिव हे दि.06.12.2024 रोजी 11.45 वा. सु. धारुर ते केशेगाव कारखाना कडे जाणारे रोडलगत अंदाजे 630 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 18 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये बेंबळी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास बोंबळी पोलिस ठाण्याचे बिट आम्लदार करीत आहेत.