साहेबलाल रसुल शेख यांनी रक्कम 3,35,786 ₹ पंडीत मोरे यांची फसवणुक केली
उमरगा : प्रतिनिधी
उमरगा पोलीस ठाणे हद्दीतील आरोपी साहेबलाल रसुल शेख, रा. इस्लामपुर ता. बसवकल्याण जि बिदर राज्य कर्नाटक, विजय उर्फ विजयकुमार शिवाजी जाधव, रा. तुरोरी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.23.01.2024 रोजी 12.30 वा. सु. मुळज शिवारात कराळी रोडजवळ फिर्यादी पंडीत शिवाजी मोरे, वय 46 वर्षे, रा. तलमोड ता. उमरगा जि. धाराशिव यांचे मालकीची ट्रक क्र के.ए.56- 5799 टाटा कंपनीची ही 5,85,789₹ चा व्यवहार होवून ट्रक विकली होती. त्यापैकी 2,50,000₹ नमुद आरोपींनी रोख दिले व राहिलेली रक्कम ही 12.02.2024 रोजी देण्याचे ठरले होते परंतु नमुद आरोपींनी रक्कम 3,35,786₹ ही वारंवार मागुनही न देता पंडीत मोरे यांची फसवणुक केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी पंडीत मोरे यांनी दि.06.12.2024रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम 420, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलिस प्रशास करीत आहे.