जिल्हाधिकारी मैनक घोष यांच्या अध्यक्षतेखाली श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या कामाची आढावा बैठक
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीमातेच्या मंदिर संस्थानच्या कामाची आढावा बैठक जिल्हाधिकारी मैनक घोष यांनी दि.७ डिसेंबर रोजी श्री तुळजाभवानी मंदिर विकासकामांची आढावा बैठक श्रीतुळजाभवानी मंदिर संस्थान, प्रशासकिय इमारत तुळजापूर येथे घेण्यात आली यावेळी त्यांनी या विविध टप्प्यांमध्ये होणाऱ्या विकासकामांबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊन पुरातत्व विभाग, मंदिर प्रशासन तसेच संबंधित कंत्राटदारांना सूचना दिल्या.


महाद्वाराचे स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर पूर्ण करून अहवाल सादर करण्याविषयी आदेश देण्यात आले. बैठकीस मंदिर संस्थानच्या तहसीलदार तथा व्यवस्थापक माया माने,नगरपालिकेचे कार्यकारी अभियंता श्रीकांत खाडे, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे स्थापत्य अभियंता राजकुमार भोसले तसेच संबंधित कंत्राटदार साईप्रेम कन्स्ट्रक्शन्स व सवाणी कन्स्ट्रक्शन्स चे प्रतिनिधी हे उपस्थित होते. पुरातत्व विभाग संभाजी नगर विभागाचे सहाय्यक संचालक हे या बैठकीस ऑनलाइन मीटिंग द्वारे उपस्थित होते.
