नरेंद्र आर्य विद्यालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन व हर घर संविधान उपक्रम साजरा

नरेंद्र आर्य विद्यालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन व हर घर संविधान उपक्रम साजरा

तुळजापूर : प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथे येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन व हर घर संविधान संविधान उपक्रम साजरा करण्यात आला. प्रतिमापूजन मुख्याध्यापक जयराज सूर्यवंशी  व विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात आले.
   यावेळी  न.प.प्रा.शा.क्र.२ येथील सहशिक्षक महेंद्र कावरे  तथा युवास्पंदन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेंद्र कावरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व संविधानावर व्याख्यान दिली.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश मगर यांनी केले आभार बाळकृष्ण गोरे यांनी मांडले. यावेळी विजयकुमार नकाते ,सह सर्व शिक्षक , शिक्षक इतरकर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!