ऑनलाईन आर्थिक फसवणुकीतील 3,71,000₹ फिर्यादींना परत, धाराशिव सायबर पोलीसांची कामगिरी.”
धाराशिव : प्रतिनिधी
सायबर पोलीस ठाणे धाराशिव तक्रारदार रोहित अगरचंद पवार, वय २५ वर्षे, रा.सापनाई ता. कळंब यांना त्यांच्या मोबाईलवर अनोळखी इसमाने फोन करुन फिर्यादीना arista Group pvt.ltd या टेलीग्राम ग्रुपवर जॉईन होण्यास सांगीतले होते. त्यानंतर फिर्यादींना Coin dcx या नावाचे ॲप डाउनलोड करण्यास सांगून फिर्यादींना वेगवेगळे टास्क देउन गुंतवणूक करण्यास सांगीतले. त्यांनतर फिर्यादींने गुंतवणुक करण्यास होकार दिला असता फिर्यादींना जादा पैशाचे अमिष दाखवले म्हणून त्यांनी टप्याटप्याने एकुण 5,59,959₹ गुंतवणुक केली. त्यांनतर फिर्यादींनी सदर इसमाकडे गुंतवणुक केलेल्या रक्कमेवर मिळालेल्या नफ्याची मागणी केली असता फिर्यादींना टेलीग्राम ग्रुपमधून काढून टाकण्यात आले. सदर बाबत फिर्यादींची फसणुक झाल्याची खात्री झाली म्हणून त्यांनी सायबर पोलीस ठाणे, धाराशिव येथे ऑनलाईन तक्रार नोंदवली होती. सायबर पोलीसांनी तात्काळ तांत्रिक विश्लेषण केले असता फिर्यादींच्या खात्यातुन आरोपीच्या विविध बॅक खात्यात वर्ग झलेले सर्व बॅक खाते गोठविले होते. त्यांनतर सायबर पोलीसांनी संबंधित बॅकांच्या नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क करुन फिर्यादींच्या गेलेल्या रक्कमेपैकी 3,71,000₹ आज रोजी फिर्यादींना परत करण्यात धाराशिव सायबर पोलीसांना यश आले आहे.कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव,अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश कासुळे, सफौ कुलकर्णी, पोलीस हावलदार- हालसे, नाईकवाडी, महिला पोलीस नाईक- पौळ, पोलीस अमंलदार-जाधवर, भोसले, मोरे, भोसले, तिळगुळे, कदम, काझी, सुर्यवंशी, महिला पोलीस अमंलदार- खांडेकर, शेख यांच्या पथकाने कामगीरी केली आहे. सायबर पोलीस ठाणेच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन मेसेज/ लिंक/फोन/क्यू आर कोड आल्यास खात्री केल्याशिवाय आपल्या बॅक खात्याशी संबंधित कोणतीही माहिती व ओटीपी फोनद्वारे देव नये. किंवा लिंकवर क्लिक/क्यु आर कोड स्कॅन करुन नये. तसेच सायबर गुन्हा घडल्यास नागरिकांनी तात्काळ हेल्प लाईन क्र.1930 वर कॉल करुन सायबर गुन्ह्याची माहिती द्यावी किंवा www.cybercrime.gov.in या ऑनलाईन पोर्टलवर तक्रार नोंदवावी किंवा सायबर पोलीस ठाणे, धाराशिव येथे तात्काळ संपर्क करावा.