वृध्द महिलेचे २२ लाखांचे ३२ तोळे सोन्याचे दागिने लांपासतुळजापूर बसस्थानकावरील मंगळवारी दुपारची घटना

वृध्द महिलेचे २२ लाखांचे ३२ तोळे सोन्याचे दागिने लांपासतुळजापूर बसस्थानकावरील मंगळवारी दुपारची घटना

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

धाराशिव मधील लग्न पार पडल्यानंतर तुळजापूर येथील देवी दर्शन घेऊन बसने उमरग्याकडे जाणाऱ्या ६५ वर्षीय वृध्द महिलेच्या पर्समधील तब्बल ३२ तोळ्यांचे सोन्याचं दागिने अज्ञात चोरट्यांनी हातोहात लांबवल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली असून, या प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलउमरगा येथील जयश्री घोडके ही ६५ वर्षीय वृध्द महिला मंगळवारी धाराशिव येथील नातेवाइकांचे लग्न कार्य पार पडल्यानंतर बसने तुळजापूर येथून त्या उमरग्याला जाण्यासाठी बस शोधत होत्या. बसस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. या वेळी छत्रपती संभाजीनगरहून उमरगाकडे जाणारी बस स्थानकात आल्याने बसमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी झालेली होती. याच बसमध्ये वृध्द महिला ही चढत होत्या. मात्र बसमध्ये चढणाऱ्याची गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी जयश्री घोडके यांच्या पर्समधील ३२ तोळे सोने हातोहात लंपास करून चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी सदरील महिलेने तुळजापूर पोलिस ठाण्यात अर्ज दाखलबसस्थानकातील सीसीटीव्हीवर प्रश्नचिन्ह, सुरक्षा राम भरोसेतुळजापूर बस्थानकात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी व बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे चालू आहेत की बंद, यावर मात्र प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. जर सीसीटीव्ही कॅमेरे चालू असतील तर चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश येणार आहे. शिवाय गर्दीच्या वेळी बसस्थानकात पोलिसाची नियुक्ती असली तरी बसमध्ये चढत असताना पोलिस गर्दीवर नियंत्रण करू शकत नाहीत. नेमक्या याच वेळी चोरटे संधीचा फायदा घेत डाव साधत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!