न.प.प्रा.शा. क्र.२येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन व हर घर संविधान उपक्रम साजरा
तुळजापूर
तुळजापूर येथील नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन व हर घर संविधान संविधान उपक्रम साजरा करण्यात आला. प्रतिमापूजन मुख्याध्यापक गणेश रोचकरी व विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहशिक्षक महेंद्र कावरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व संविधानावर व्याख्यान दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरजमल शेटे यांनी केले आभार सुज्ञानी गिराम यांनी मांडले. यावेळी केरण लोहारे, अंगणवाडीच्या किरण गरडकर, श्रीदेवी पाचंगे, शिवा डाके, नंदा जमदाडे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.