धाराशिव पोलीसांची क्रीडा स्पर्धा संपन्न
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
पोलीस दलातील अधिकारी व जवानांच्या अंगभूत क्रीडा गुणांना वाव मिळावा, त्यांची शारीरिक क्षमता वृद्धिंगत व्हावी या हेतूने धाराशिव पोलीस दलात दि.१२ ते १३ सप्टेंबर या कालावधीत तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण सोहळा पोलीस मुख्यालयातील क्रीडांगणावर पार पडला. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष, तसेच दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ विभाग तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्रीमती भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, दराडे, राखीव पोलीस निरीक्षक पठाण यांच्यासह अधिकारी व पोलिस खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.