अयोध्या नगरात सभागृहाचे भूमिपूजन
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, युवा नेते विनोद गंगणे तसेच माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक २ मधील अयोध्या नगर येथे नागरिकांच्या मागणीनुसार तुळजापूर नगरपरिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले.
या कार्यक्रमात भाजपा तालुकाध्यक्ष आनंद कंदले, माजी नगरसेवक औदुंबर कदम, संदीप गंगणे, धैर्यशील दरेकर, दिनेश क्षीरसागर व सचिन कदम यांच्या हस्ते श्रीफळ फोडून विकासकामांना प्रारंभ करण्यात आला.
भूमिपूजन प्रसंगी प्रभागातील नागरिक नंदकुमार हाजगुडे, बापूसाहेब अमृतराव, शंकर जाधव, बाळासाहेब मुळे भोसले दादा, कदम काका, रोडे तात्या, तुकाराम मुळे, दिलीप पुजारी, बाळासाहेब मुळे, बळीराम माने, जेटीथोर, पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्याला परिसरातील महिला वर्गासह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वागत केले.