तुळजाभवानी महाविद्यालयात,एनसीसी कॅडेटनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देशसेवेत योगदान द्यावे –पोलिस उपनिरीक्षक निंबाळकर यांचे मार्गदर्शन
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजाभवानी महाविद्यालय, तुळजापूर येथे आयोजित मार्गदर्शनपर व्याख्यानात पोलिस उपनिरीक्षक राम निंबाळकर यांनी एनसीसी कॅडेटसना मौल्यवान मार्गदर्शन केले. “एनसीसी कॅडेटनी अनुशासन, शिस्त, देशसेवा व देशप्रेम या मूल्यांचा अंगीकार करावा. विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळवून राष्ट्रसेवेत योगदान द्यावे,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
राष्ट्रीय छात्रसेनेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन पवार, एनसीसी विभाग प्रमुख प्रा. बालाजी कऱ्हाडे, प्रा. नीलेश एकदंते, प्रा. सुदर्शन गुरव आदी उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. पवार म्हणाले की, “कॅडेटनी देशाचा सन्मान, आई-वडिलांचा व गुरुजनांचा सन्मान करीत नवीन गोष्टी शिकण्याचे ध्येय बाळगले पाहिजे. संस्कार आणि शिस्त हीच खरी ताकद आहे.”
प्रा. कऱ्हाडे यांनी महाविद्यालयातील एनसीसी विभागाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या उपक्रमांचे कौतुक प्राचार्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकांक्षा भोरे हिने केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. बालाजी कऱ्हाडे यांनी करून दिला. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. गोकुळ बाविस्कर, प्रा. बापू पवार, प्रा. मंत्री आडे, प्रा. नेताजी काळे, प्रा. अभिमन्यू कळसे आदींनी विशेष पुढाकार घेतला.