बोरी जवळ कार पलटी झालेल्या अपघातात दोघे जखमी;जीवित हानी कोणाची नाही.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
राष्ट्रीय महामार्ग तुळजापूर तालुक्यातील बोरी परिसरातील कार पलटी होवून झालेल्या अपघातात चालकासह एकजन जखमी झाले आहे. दि.१ सप्टेंबर रोज वेळ ४ ते ५ च्या वेळी आय ट्वेन्टीकार एम.एच-२५- ए.एल-५५२१ धाराशिव वरून तुळजापूरच्या दिशेने येत असताना पोरीच्या जवळ कुत्र आडवं आल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून गाडी दोन्ही रोडच्या मदोनद खेड्यात पलटी झाली झाली.
१०८ ॲम्ब्युलन्सला उशीर लागत असल्याने तुळजापूरच्या दिशेने जात असलेल्या ऑटो रिक्षा मध्ये जख्मीं दोघांनाही तुळजापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल केले आहे.या अपघातात झालेल्या गाडीत माजी नगरसेवक पंडितराव जगदाळे यांचा पुतण्या सुरज जगदाळे आणि त्यांच्या शेजारी बसलेले त्यांचे मित्र घोलकर हे दोघे किरकोळ जखमी झाले आहे. किरकोळ जखमी दोघांनाही खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल केले आहे.