पत्रकार सुनील ढेपे यांच्यावर आकसबुद्धीने केलेल्या कारवाई विरोधात अणदूर भागातील पत्रकारांचे नळदुर्ग पोलीस निरीक्षकयांना निवेदन

पत्रकार सुनील ढेपे यांच्यावर आकसबुद्धीने केलेल्या कारवाई विरोधात अणदूर भागातील पत्रकारांचे नळदुर्ग पोलीस निरीक्षकयांना निवेदन

अणदूर – पत्रकारांवर होणारी अन्याय, दडपशाही आणि खोट्या कारवायांविरोधात अणदूर येथील पत्रकारांनी एकत्र येत पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहे भूम येथील पत्रकार चंद्रमणी गायकवाड आणि ‘धाराशिव लाईव्ह’चे संपादक सुनील ढेपे यांच्यावर आकसबुद्धीने खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करत, या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. या प्रकरणी तातडीने चौकशी करून पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे देण्यात आले आहे

रविवारी ३१ ऑगस्ट रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार अनेक वर्षांपासून समाजातील घडामोडी, जनहिताचे प्रश्न, शासकीय योजना, भ्रष्टाचार आणि अवैध धंदे यावर वार्तांकन करत आहेत,मात्र, काही दिवसांपासून पत्रकारांवर दबाव आणण्याच्या हेतूने खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार वाढले आहेत, भूम आणि धाराशिव येथील पत्रकारांवरील कारवाई ही याच दडपशाहीचा भाग असल्याचा दावा करत, पत्रकारांनी या घटनांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

पत्रकारांवर होणारे अन्याय, धमक्या आणि खोट्या गुन्ह्यांची तातडीने निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी, पत्रकार संरक्षण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करून पत्रकारांना संरक्षण देण्यात यावे आणि धमक्या देणाऱ्यांवर कडक शासन व्हावे, अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे.

या निवेदनावर पत्रकार सचिन तोग्गी  , दयानंद काळुंके, शिवशंकर तिरंगुळे, संजीव आलुरे , चंद्रकांत गुड्डू, प्रसन्न कंदले , श्रीकांत अणदूरकर लक्ष्मण नरे  , दिनेश सलगरे केशव गायकवाड आणि शिवाजी कांबळे यांच्यासह अन्य पत्रकारांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!