भवानी मातेच्या दर्शनाने “दैवी शक्ती” मिळते-अभिनेते गिरीश परदेशी
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
अवघ्या विश्वाची जगतजननी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनाने “दैवी शक्ती” मिळते,छत्रपती शिवाजी महाराज यांना आशीर्वाद रुपी भवानी तलवार देणारी माता यांच्यासमोर नतमस्तक होत भावनिक उद्गार
“फॉरेनची पाटलीन” चित्रपटातील अभिनेते गिरीश परदेशी यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बोधले यांचे घनिष्ठमित्र “फॉरेनची पाटलीन” चित्रपटातील अभिनेते गिरीश परदेशी यांनी दि.१सप्टेंबर रोजी विधिवत पूजा करून श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतल्यानंतर जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बोधले परिवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन महालक्ष्मी दर्शन घेतले यावेळी बोधले परिवाराच्या वतीने शाल श्रीफळ फेटाबांधून, साडीचोळीची ओटी भरून देवीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला यावेळी
शिवाजी बोधले,सौ सुदर्शनी शिवाजी बोधले,शिवांकुर शिवाजी बोधले,आदित्य अमृतराव,उमेश महामुनी,सारंग कावरे आदि उपस्थित होते.
मराठी चित्रपटातील अभिनेते गिरीश परदेशी यांनी सहकुटूंब सह परिवारांनी देविचे दर्शन घेतले आई तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर “दैवी शक्ती” मिळते बोलत होते.