मनोज दादा जरांगे पाटील यांच्या शिलेदारांच्या भोजनाची व निवासाची व्यवस्था;नेरूळमधील तेरणा परिवारानी जबाबदारी स्वीकारले

मनोज दादा जरांगे पाटील यांच्या शिलेदारांच्या भोजनाची व निवासाची व्यवस्था;नेरूळमधील तेरणा परिवारानी जबाबदारी स्वीकारले

तुळपापूर : ज्ञानेश्वर गवळी

आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी हजारो मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईलाजात आहे
मनोज दादा जरांगे पाटील यांच्या हजारो शिलेदारांच्या भोजनाची व निवासाची व्यवस्थानाची व्यवस्थ नवी मुंबई येथील नेरुळच्या तेरणा विद्यालय आणि जुनिअर कॉलेज परिसरात तमाम मराठा बांधवांची राहण्याची, जेवणाची आणि वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र रोज वाढत असलेली संख्या, त्यात पावसाचे दिवस असल्याने आता एकाच वेळी पाच ते सहा हजार समाज बांधवांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यासाठी वेगात काम सुरू आहे. त्यासाठी मोठ्या मैदानात वॉटरफ्रूफ डोंब उभारला जात आहे. आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या हजारो शिलेदारांच्या भोजनाची आणि निवासाची व्यवस्था आपल्या तेरणा परिवाराच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.

लाखोंच्या संख्येनं मुंबईत दाखल झालेल्या आपल्या बांधवांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी तेरणा परिवाराने मोठ्या आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली आहे. नेरूळमधील तेरणा परिवाराचे सदस्य धाराशिवमधून आलेल्या आपल्या गावाकडच्या मराठा बांधवांसाठी ज्या प्रकारे पुढे सरसावले आहेत, ती खरोखरच हृदयाला स्पर्श करणारी भावना आहे. धाराशिव जिल्ह्यातून शेकडो किलोमीटर दूर मुंबईत आलेल्या आपल्या बांधवांना स्वतःच्या  घरून जेवण बनवून देत आपल्या माणसांची काळजी ते घेत आहेत. संघर्षाच्या वाटचालीत ही आपुलकीची सावली मिळणं म्हणजेच खरी ताकद आहे.याउपरही काही अडचणी आल्यास अथवा कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

श्रीहरी मुंढे – 8169880803

दादा पवार – 9594654770

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!