तुळजापूर तालुक्यातील तीर्थ खुर्द नागोबा देवस्थाना जवळ;धावत्या एसटीने घेतला पेट
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजापूरकडून नळदृगच्या दिशेने निलेगावला जानाऱ्या एसटी बसने तीर्थ खुर्द नागोबा देवस्थान परिसरात अचानक पेट घेतला. या बसमध्ये प्रवासी होते. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. या बसचा चालक केबिनचा काही भाग यात जळाला. ही घटना तुळजापूर- नळदुर्ग महामार्गावरील तुळजापूर तालुक्यातील नागोबा मंदिर तीर्थ खुर्द परिसरात दि.२३ ऑगस्ट रोजी दुपारी घडली.
तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी पोहचले. यावेळी बसमधील प्रवाशांना दुसर्या बसमधून पुढील प्रवासासाठी पाठविले.