पहिल्या यशानंतर दुसऱ्या एफएमजी इ परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरित्या उत्तीर्ण..
डॉ.अंकिताचा शिवाजी बोधले यांच्या वतीने “प्रेरणादाई सन्मान”स्त्री शक्तीच्या नगरीत कौतुकाचा वर्षाव…
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य गुलचंद व्यवहारे यांची सुकन्या अंकिताने जॉर्जिया बाहेर देशामधून एमबीबीएस शिक्षण पूर्ण केले आणि भारतात आल्यानंतर पहिल्यांदाच एफएमजी इ परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरित्या उत्तीर्ण व एमबीबीएस डिग्री मिळाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बोधले व सुहास साळुंके,उपाध्य पुजारी मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो,जेष्ठ वल्लभ आप्पा कदम
यांच्या वतीने “प्रेरणादाई सन्मान” स्त्री शक्तीच्या पुण्य पावन नगरीत कौतुकाचा वर्षाव…
“प्रेरणादाई सन्मान”
अंकिताने तीच्या प्रवासातून दाखवून दिले जिद्द चिकाटी आणि दृढनिश्चयाने जगात काहीही जिंकता येते तिचा प्रवास प्रेरणादायी आहे.आई-वडिलांनी त्यांना अतुलनीय पाठिंबा दिला.बाहेर देशातून आल्या नंतर डॉ.अंकिताने पहिल्या यशानंतर दुसऱ्या एफ एम जी इ परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरित्या उत्तीर्ण झाली डॉ.अंकिताती तिच्या यशाचे श्रेय तिच्या आई-वडिलांच्या प्रयत्नांना आणि कठोर परिश्रमाला देते.
स्त्री ही केवळ एक व्यक्ती नसून ती शक्ती,प्रेरणा आणि परिवर्तनाचा स्त्रोत आहे, या विचाराने प्रत्येक मुलीने स्वतःवर विश्वास ठेवून उंच भरारी घ्यावी,डॉ. अंकितासारखे आत्मविश्वास जिद्द चिकाटी पाहून इतर मुलींनीही तिच्यासारखेच आत्मविश्वासपूर्ण आणि नेतृत्वक्षम बनण्यासाठी प्रेरणा घ्यावी.
धाराशिव भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव बोंधले,तुळजापूर