“बैल पोळासन”;नंदी आई भवानी मातेच्या भेटीला..
श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात बैलपोळा सण उत्साहात साजरा…
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात मोठ्या उत्साहात बैलपोळा सण साजरा बैलपोळा सणानिमित्त “नंदी” आई तुळजाभवानीमातेच्या भेटीला..
श्री.तुळजाभवानी मातेच्या मंदीरातील मठाचे “नंदी” कमानवेस येथील मारूती मंदिरापासून वाजत-गाजत मंदिरात आणण्यात आले.नंदिला पुरणपोळीचा नैवेद्य देऊन श्री तुळजाभवानी मंदीरात मुख्य गाभाऱ्यासमोर नंदीची भवानी मातेला भेटऊन पुजा करण्यात आली. तुळजापूर शहरात बैलपोळा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डुल्या मंदिरात देवीचे महंत तुकोजीबुवा व चिलोजीबुवा तसेच पुजारी पाटील यांचे मानाचे नंदी आल्यावर त्यांना सजविण्यात आले. पूजन झाल्यानंतर वाजत- गाजत नंदिबैलांना श्री तुळजाभवानी मंदिरात आणण्यात आले. मंदिरात नंदिबैलांचे पारंपारिक पद्धतीने तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात देवीला भेटऊन पूजन करण्यात आले.
नंदिबैलांना देवीचे दर्शन घालून झाल्यानंतर महंत व पुजारी बांधवांनी नंदिबैलाचे पूजन केले. त्यानंतर नंदिबैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आल. वाजत गाजत नंदिबैल मठाकडे रवाना झाले. यावेळी महंत तुकोजीबुवा, व्यवस्थापक तहसीलदार अरविंद्र बोळंगे, दोन्ही मठाचे सेवक, पुजारी, सेवेकरी, भाविक व मंदिर संस्थानचे कर्मचारी आदि उपस्थित होते.