तुळजाभवानी महाविद्यालयात ११ वी विज्ञान शाखा सुरू
तुळजापूर : प्रतिनिधी
तुळजाभवानी महाविद्यालयास इयत्ता ११ वी विज्ञान शाखा सुरू करण्यास शासन मान्यता मिळाली आहे. तुळजाभवानी महाविद्यालयास इयत्ता ११ वी विज्ञान शाखा सुरू झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय होणार असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन पवार यांनी सांगीतले आहे.
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी कला व वाणिज्य शाखेबरोबर विज्ञान शाखा सुरू करण्याचा मानस व्यक्त केला होता. तो मानस पूर्ण झाला आहे. तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर बस स्टॅन्ड पासून जवळ असल्यामुळे तुळजापूर पंचक्रोशीतील विद्यार्थी-विद्यार्थिनीनी विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याची सोय झाली आहे. गेल्या कित्येक वर्षापासून विद्यार्थी व पालक विज्ञान शाखेची मागणी करत होते. पालकांची मागणी संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्था सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे, संस्था मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, आ. राणाजगजीतसिंह पाटील यांच्या प्रयत्नामुळे पूर्ण झाल्याचे प्राचार्य डॉ. पवार यांनी सांगीतले.
मुक्त विद्यापीठाचा बी. ए., बी. कॉम अभ्यासक्रम
महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ पासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांचा बी. ए. व बी. कॉम चा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विद्यापीठाने मान्यता दिली असल्यामुळे नोकरी करणाऱ्यांना, इतर कामे करावी लागत असणाऱ्यांना, शिकण्याची इच्छा असूनही, शिकता येत नव्हते अश विद्यार्थी-विद्यार्थिनींना आपली शिकण्याची इच्छा पूर्ण करता येईल. त्यासाठी त्यांनी त्वरित महाविद्यालयात येऊन आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन प्राचार्य डॉ. पवार यांनी केले आहे.