मराठी क्रांती मोर्चाची रथयात्रा, सरकारला सदबुद्धीदे श्री तुळजाभवानीकडे साकडं;मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड
“आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही”
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
मराठा आरक्षणासाठी मोर्चे झाले आंदोलन झाले तरीही सरकार आरक्षण देत नसल्याने आई भवानी तु या सरकारला सद्बुद्धी दे असे साकडे मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी बुधवार दि.२० रोजी श्री तुळजाभवानी देविला घातले यावेळी बोलताना गायकवाड म्हणाले कि
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जनजागृती काढल्याचे सांगुन २८ तारखेला याचा सांगता होताच आम्ही मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आदोलनात सह भागीहोऊन समाजाला न्याय मिळेपर्यत त्या संघर्ष लढ्यात सहभागी होणार आहोत सरकारने आरक्षण न दिल्यास मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना कार्तिक एकादशीला अडवणार मराठ्यांची दहशत देशाला माहीत आहे आम्ही ठरवले तर कुणी का माईका लाल असेना मुख्यमंत्र्यांना पंढरपूरात येवु देणार नाही म्हटल कि नाहीच असा इषारा यावेळी दिला.
रथयात्रा छत्रपती शिवाजी महाराज रायगड, राजमाता माँ जन्मस्थळ,शिवतीर्थ आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना भेट देणार आहे.यावेळी आशु लबडे ,अर्जून आप्पा सांळुके, विकी वाघमारे, धनगर समाजाचे संतोष दुधभाते अविनाश नवगिरे ,कुमार टोले यावेळी मंदीरात हजारो मराठा बांधव,उपस्थितीत होते यावेळी जयभवानीजयशिवाजी मराठ्यांना आरक्षण ओबीसीतुन दिलेच पाहिजे अशा घोषणांना मंदीर परिसर दणाणुन गेला होता.