डॉ. अंकिता गुलचंद व्यवहारे यांचा समर्थ पतसंस्थेच्या वतीने सत्कार
तुळजापूर – तुळजापूर येथील डॉ. अंकिता गुलचंद व्यवहारेह यांनी जॉर्जिया मध्ये एमबीबीएस शिक्षण पूर्ण केल्या बद्दल तसेच पहिल्याच प्रयत्नात भारतामधील एफएमजीई परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्याबद्दल समर्थ पतसंस्थेच्या वतीने संस्थेचे चेअरमन नारायण नन्नवरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे व्हा चेअरमन श्रीकांत भोजने संस्थेचे सचिव सज्जन जाधव, गुलचंद व्यवहारे अजिंक्य नन्नवरे यांच्या सह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.