तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी 38 वा आरोपी निष्पन्न .
सोलापूर येथील राजू उर्फ पिटू सुर्वे यास अटक सात दिवसाची मिळाली पोलीस कोठडी .
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात नवीन आरोपी निष्पन्न झाला असून सोलापूर येथील राजू उर्फ पिटू सुर्वे यास तामलवाडी पोलिसांनी अटक केली आहे .त्यास न्यायालयासमोर हजर केले असता सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की राज्यभर चर्चेत असलेल्या तुळजापूर येथील ड्रग्स प्रकरणात आत्तापर्यंत एकूण 37 आरोपी निष्पन्न झाले होते त्यामध्ये एका नवीन आरोपीची भर पडली असून 38 व आरोपी म्हणून सोलापूर येथील बुधवार पेठेतील रहिवासी असलेला राजू उर्फ पिटू सुर्वे यास पोलिसांनी अटक केली आहे आत्तापर्यंत या प्रकरणात 21 जणांना अटक करण्यात आली आहे तर 16 जण फरार असून एकास अटकपूर्व जामीन मिळालेला आहे फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत दरम्यान नवीन आरोपी निष्पन्न झाल्याने आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची यामध्ये शक्यता निर्माण झाली आहे . या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख व तामलवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर हे करत आहेत.
खासदार आमदार यांच्या मागील पत्रकार परिषदेतील उल्लेख केलेला अरोपी आटक
दरम्यान काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी सोलापूर येथील पिटू सुर्वे यांचा नामोल्लेख ड्रग्ज प्रकरणात असल्याचा गौप्यस्फोट केला होता तसेच मुंबई येथील अतुल अग्रवाल याचे नाव देखील त्यांनी घेतले होते त्यानंतर यामध्ये राजू उर्फ पिटू सुर्वे यास अटक झाली आहे.