नजराणा रकमेशिवाय दस्त नोंदणी नाही;विनानजराणा कबाला जागेची कोट्यावधीची खरेदी
महसूल बुडवून वाम मार्गाने खरेदी;जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज!
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
नजराणा भरण्यासाठी पात्र असलेल्या कबाला जमिनींची नोंदणी दस्ताद्वारे परस्पर खरेदी-विक्री करून शासनाचा कोठयावधी महसूल बुडविण्याच्या प्रकार उघडकीस तुळजापूर शहरातील सिटीसर्वे नंबर २३९७ / १ हि जागा हैदराबाद येथील गोपाल मगनसिंग ठाकूर व इतर यांनी दि.३०/६/२०२२ रोजी दुय्यम निबंधक तुळजापूर यांच्या कडील खरेदी दस्त क्रमांक २८३७/२०२२ रोजी खरेदी घेतली होती. सदर जागे संदर्भात त्यांनी फेरफार घेण्यासाठी मा उपाधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय तुळजापूर यांच्याकडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 141 नुसार महसूल दप्तरी नोंद घेण्यासाठी ०६/०७/२०२२ रोजी गोपाल मगनसिंग ठाकूर व इतर व्यक्तीनी अर्ज दिला होता सदर नोंद महसूल दप्तरी घेऊनये म्हणून गणेश रामचंद्र कदम रा.कमान वेस तुळजापूर यांनी सदरचा फेरफार घेऊ नये म्हणून तक्रार केली होती सदर तक्रारीच्या अनुषंगाने मा उपाध्यक्ष भूमी अभिलेख साहेब तुळजापूर यांनी सुनावणी ठेवली तक्रारदार यांच्या वतीने ॲड, अश्विनकुमार अरुणराव घोरपडे यांनी तक्रार यांच्या वतीने बाजू मांडली सदर जागा ही शासकीय जागा गट.(क) असून कबाल्याची जागा असल्याने सदरचा दस्त हा शर्तीपोटी भंग झाला असल्याने तसेच सदर जागा खरेदी करण्यासाठी मा.जिल्हाधिकारी धाराशिव यांची (नाहरकत ) पूर्वपरवानगी घेने बंधनकारक असताना त्यांनी कुटल्याही प्रकारची परवाणगी न घेता सदरचा दस्त नोंदविला गेला जो की बेकायदेशीर असल्याने सदरचा फेरफार हा ना मंजूर करण्यात यावा असे आशयाचा युक्तिवाद मांडून सदरचा घेतलेला फेरफार क्रमांक ५९८५ हा रद्द करण्यात यावा व शर्ती पोटी भंग झालेल्या दस्ताच्या शासकीय नजराना रक्कम जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात भरून घेतल्यानंतर सदरचा फेरफार मंजूर करण्यात यावा फिर्यादीतर्फे दाखल केलेली कागदपत्रे ,पुरावे ग्राह्य धरून मा उपाधीक्षक भूमि अभिलेख अधिकाऱ्यांनी सदरचा फेरफार रद्द केला.
भुमि अभिलेख, कार्यालय तुळजापूर
सदर कबाली जागेचा निकाल दि.४/६/ २०२५ रोजी भूमी अभिलेख कार्यालय तुळजापूर यांनी पारित केला.
https://acrobat.adobe.com/id/urn:aaid:sc:AP:f636ce68-3569-4d93-80cc-f57eb359f921 भुमि अभिलेख, कार्यालय तुळजापूर यांचा आदेश