नगरपरिषद शाळा क्रमांक एक चालू करावी – बापूसाहेब भोसले
तुळजापुर : प्रतिनिधी
येथील नगर परिषद शाळा क्र. एक हे अनेक दिवसापासून बंद असून ते लवकरात लवकर चालू करावी अशी मागणी शिंदे शिवसेनानेच्या तुळजापूर नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
शहरात या पूर्वी नगर परिषद शाळा क्रं.१ ही ऐतिहासिक शाळा आहे होती शाळेमधून शिकून गेलेले विद्यार्थी हे आज उच्च पदावर कार्यरत आहेत, परंतू मध्यंतरीच्या काळात काही कारणास्तव शाळा बंद पडल्या आहेत. खाजगी शाळेमध्ये अफाट डोनेशन घेत आहे, तरी सदरील डोनेशन हे गोरगरीब, शेतकरी, रोजंदारी करणारे मजूर व इतर सर्व नागरिक या भागात अनेक गोरगरीब जनता आर्थिक परिस्थिती नसल्याने शिक्षक घेवू शकत नसल्याने सदरील शाळा चालू करण्याचे आदेश देण्यात यावे
येत्या आठ दिवसाच्या आत चालू नाही झाल्यास आपल्या कार्यालयासमोर लोकशाही पध्दतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा एका लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.या निवेदनावर तालुकाध्यक्ष अमोल जाधव, शहराध्यक्ष बापूसाहेब भोसले यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.