भवानी मातेच्या दर्शनाने आत्मिक शक्ती मिळते – माजी आमदार संजय जगताप
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
अवघ्या विश्वाची जगतजननी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना बळ देणारी आई श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनाने आत्मिक शक्ती मिळते.अशी भावना सहकुटुंब दर्शनानंतर कॉग्रेस पक्षाचे माजी आमदार संजय जगताप यांनी व्यक्त केली.
सहकुटुंब दर्शनानंतर पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय चंदूकाका जगताप,सौ राजवर्धिनी संजय जगताप,समरादित्य संजय जगताप यांचा मंदिर संस्थान व
तुळजापूर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी यांच्या वतीने शाल श्रीफळ,देवीची प्रतिमा देऊन फेटा बांधून सत्कार करण्यात आला.यावेळी सहायक जनसंपर्क अधिकारी प्रशांत जाधव, लेखापाल तेजस तसेच
पुजारी दिनेश कापसे यांच्यासह आमदार साहेबांचे कुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते.