नियुक्ती:शिवसेना शिंदे गट तुळजापूर तालुका प्रमुखपदी अमोल जाधव यांची नियुक्ती
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर येथील रहिवासी तथा शिवसेना शिंदे गटाचे सक्रिय कार्यकर्ते अमोल शिवाजीराव जाधव याची तुळजापूर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या १०८ गावांकरिता तुळजापूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदरील नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना पक्षाचे सचिव संजय मोरे,सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते यांच्या आदेशाने यांनी केली.
ही नियुक्ती एक वर्षासाठी असून या काळात आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार अणि आनंद दिघे यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार-प्रसार करून शिवसेना वाढवण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करावे, असे नमूद करण्यात आले आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सापत्निक वागणुकीला कंटाळून, शिवसेना ठाकरे गटाला ठोकला होता राम राम…
काही महिन्या पुर्वी अमोल जाधव यांनी सापत्निक वागणुकीला कंटाळून, शिवसेना ठाकरे गटाला ठोकला होता राम राम… शिवसेना शिंदे गटात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत मुंबई येथे शिवसेनेत घेतला होता प्रवेश त्यांची दि.८ जून रोजी तुळजापूर तालुका प्रमुख पदी अमोल जाधव यांची नियुक्ती.