मुख्याधिकारी यांच्या आदेशाने राजाभाऊ माने यांच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर
बेकायदा बांधकामांवर पालिकेचा हातोडा; किरण इंगळें सफल!
धाराशिव : प्रतिनिधी
तुळजापूर शहरातील हडको परिसरात बेकायदेशीर बांधकामावर अखेर नगर पालीकेची कडक कारवाईचा बडगा उचलत नोटीस बजावत हातोडा उघारला. बेकायदा बांधकामाविरोधात किरण धोंडीबा इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीची पालिकेने गंभीर दखल घेत राजेंद्र दिगंबर माने यांना महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे.
दि.२९ मे २०२५ रोजी दिलेल्या नोटीसीनुसार, माने यांनी मूळ बांधकाम परवानगीपेक्षा ७ फूट अधिक क्षेत्रावर अनधिकृत बांधकाम केल्याचे स्पष्ट झाले आहे. मूळ परवानगी असलेले क्षेत्र पूर्व-पश्चिम ४० फूट व दक्षिण-उत्तर २५ फूट असताना, सद्यस्थितीत पूर्व-पश्चिम ४० फूट व दक्षिण-उत्तर ३२ फूट बांधकाम उभारले गेले आहे.
नगरपरिषदेच्या आदेशानुसार, बांधकाम महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमाच्या कलम ५३(१) चे उल्लंघन केली असून, कोणतीही अधिकृत मंजुरी न घेता बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे राजाभाऊ माने यांना ३० दिवसांच्या आत लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा, नगर पालिकेच्या खर्चावरच बांधकाम हटवण्यात येईल आणि त्यासाठी आपण जबाबदार असाल,असा इशाराही मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी दिला आहे.
या प्रकरणाची तपासणी व कारवाई नगर पालिकेचे मुख्याधिकारी व नगर रचना अभियंता यांच्या हस्ते करण्यात आली आहे. किरण इंगळे यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई झाली असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.