असे म्हणतात..मुंबई कधी थांबत नाही.. पण आज मुंबई थांबली..!
मुंबई : मुंबईने मराठ्यांना स्वीकारले,स्वागत केले,काळजी घेतली आणि सहभागी झाले.जागोजागी मराठा वादळ मुंबईत दिसून येत आहे.जिकडे नजर जाईल तिकडे मराठा आंदोलक आहेत.लोणावळ्यापासून मुंबई पर्यंत गाड्यांच्या जागोजागी रांगा आहेत.अनेक महत्त्वाचे रस्ते पूल गाड्यांनी भरून गेले आहेत.जिथे जागा मिळेल तिथे आंदोलक थांबत आहेत.ही सगळी किमया एकट्या माणसाने करून दाखवली आणि मुंबई जॅम झाली.मराठयांनी करून दाखवले आणि सिद्ध केले मुंबई मराठ्यांचीच..!! मराठा ऊर्जेला सलाम..!! मानाचा मुजरा..!!
शब्दरचना राहुल पोकळे,राष्ट्रसेवा समूह.
मनोज दादा जरांगे पाटलांची खंबीर साथ म्हणजेच ॲड, योगेश केदार
कालपासून सरकार ने आझाद मैदानातील आंदोलकांना खायला मिळू नये अशी व्यवस्था केली आहे. वनवास यात्रेच्याही वेळी पोलिसांनी आमचा अनन्वित छळ केला होता. पण संकटा ला घाबरून मैदान सोडणार ते मराठे कसले. मैदानात तटून राहिलो, माझ्या मराठा समाजाला ओबीसी आरक्षण समजाऊन सांगण्यात यशस्वी झालोच. त्याचं वेळी म्हणालो होतो येणार येणार लाखोंच्या संख्येने येणार. अन आज आलोच. तेंव्हा मुंबईतील चुनाभट्टीच्या बांधवांनी गनिमी कावा करून आमच्या पर्यंत जेवण पोचवलेच. सरकार ने याहीवेळी खाण्या पिण्याचे स्टॉल बंद करायला लावले. पण सगळा मराठा समाज जेवण घेऊन येणार आहे
हा व्हिडिओ १२ जुलै २०२३ चा आहे. या विडिओच्या बरोबर दीड दोन महिन्या नंतर अंतरवली येथे पोलिसांनी लाठीचार्ज केला. माता भगिनींवर गोळीबार केला. त्यानंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा खडबडून जागा झाला.
आम्ही सुद्धा अंतरवली च्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. मी ठरवलं की आता समाजात एकी निर्माण करणे जास्त गरजेचे आहे. मग स्वतः चा मोठेपणा सोडून संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून जरांगे पाटलांच्या नेतृत्वाची महती सांगत फिरलो. पुन्हा एकदा समाजाला ओबीसी मधला हिस्सा कसा मिळवता येईल हे सांगून लोकांना जागे करत राहिलो.
आज आम्ही गरीब घरातल्या पोरांनी बघितलेल्या स्वप्नांची स्वप्नांची पूर्तता होत आहे. यावेळी ५०% च्या आतले ओबीसी अरक्षण घेतल्या शिवाय सुट्टी नाही.