पावणाऱ्या गणपतीच्या आरतीचा मान श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या तहसीलदारमॅडमनां
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
श्रीमंत राजयोगी पावणारा गणपती राजा कंपनी तरुण मंडळाच्या पावणाऱ्या गणपतीचा आरतीचा मान व्यवस्थापक तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या तहसीलदारांना देण्यात आला यावेळी शहाजी रुपनार सहाय्यक पोलिस निरीक्षक सीआयडी, अमोल भोसले, व्यवस्थापक मंदिर संस्थान, नागेश शितोळे मंदिर संस्थान तुळजापूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी उपस्थितीत होते. ही एक पावणाऱ्या गणपतीच्या मंडळाची पारंपारिक पद्धत जोपासतात. ज्यामध्ये
श्रीमंत राजयोगी पावणारा गणपती मंडळ गणेशोत्सवाच्या निमित्ताने विशेष पूजाअर्चा आणि आरतीचा मन विविध मान्यवरांना देतात.
पावणाऱ्या विघ्नहर्ताचे धार्मिक महत्व
श्री तुळजाभवानी मंदिर हे एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे. ज्यामध्ये भवानी मातेची पूजा केली जाते.मंदिराच्या परिसरात विविध धार्मिक विधी आयोजित केले जातात. श्री तुळजाभवानी मंदिराची परंपरा जपणे ही एक महत्त्वाची बाब आहे.अशा मंदिर संस्थांच्या अधिकारी मान्यवरांना पावणाऱ्या गणपतीच्या आरतीचा मान देण्यात आला.हे सर्वजण उपस्थित होते .मंडळाचे सर्व ज्येष्ठ सभासद अध्यक्ष व सर्व पावणाऱ्या गणपती मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.