श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ बडतर्फे किंवा निलंबीत करा सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांची मागणी

श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ बडतर्फे किंवा निलंबीत करा सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांची मागणी

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ न्यास नोंदणी क्रमांक F-136 याचे सध्याचे विश्वस्थ मंडळ हे बेकायदेशीर व संस्थेच्या हिताविरूध्द व उद्देशाविरूध्द वागून संस्थेचे आर्थिक नुकसान करून भ्रष्टाचाराचा अड्डा बनून राहिल्यामुळे व संस्थेच्या स्थावर मालमत्तेविषयी निष्क्रीयता दाखवून नुकसान केल्याबद्दल सदरचे विश्वस्थ मंडळ आपण चौकशी करून तात्काळ बडतर्फे किंवा निलंबीत करण्यात यावे.व सर्व चौकशीअंती सदरच्या विश्वस्थ मंडळावर फौजदारी स्वरूपाचे गुन्ह नोंद करण्याचे आदेश दयावेत.

१) श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ न्यास नोंदणी क्रमांक A-136 ही संस्था तुळजापूरातील सर्व पुजारी बांधवांसाठी त्याचे हक्क, अधिकार व त्यांचे मानपान अबाधित रहावेत व धर्मादाय आयुक्त कार्यालयात त्याची रितसर नोंद असावी हा उद्देश ठेवून सदरची संस्था १९ या वर्षी नोंदणीकृत करण्यात आली.

१) संस्थेच्या घटनेनुसार संस्था ही चालली पाहिजे परंतू संस्थेच्या हिताविरूध्द व उद्देशाविरूध्द बेकायदेशीरपणे संस्थेचे कामकाज चालत असेल तेथे अनैतिकता पसरली असेल संस्थेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचे नुकसान होत असेल तर सदरच्या विश्वस्थ मंडळास बडतर्फ किंवा निलंबीत करणे कायदयानुसार गरजेचे आहे. नाहीतर संस्था मोडकळीस निघायला वेळ लागणार नाही.

३) श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ या न्यास संस्थेच्या घटनेमध्ये निवडणूकीनंतर जे विश्वस्थ मंडळ अस्तित्वात येईल, त्याचा कार्यकाळ 5 वर्षाचा असेल हे घटनेमध्येच नमूद आहे. परंतू सध्याचे विश्वस्थ मंडळ हे घटनेविरूध्द जावून तब्बल ११ वर्षे होऊनही पत मिळा फायदेशीरपणे कामकाज हाकत आहे व सदर संस्थेचा कारभार हा मनमानीपध्दतीने व न्यासाच्या हिताविरूध्द चालू आहे. न्यास संस्थेचे सचिव काकासाहेब शंकरराव शिंदे हे मयत झालेले असून त्यानंतर या विश्वस्थ मंडळाने दिनांक चेंज रिपोर्ट दाखल करून त्या जागी संस्थेला सचिव नेमलेला नाही संस्थेला सचिव न नेमता संस्थेचे प्रशासनिक काम करता येत नाही. या विश्वस्थ मंडळाने कधीही जनरल बॉडी मिटींग घेतलेली नाही, सगळयांचे मत जाणुन घेवून ठराव पास केलेले नाहीत, त्यामुळे सदरची विश्वस्थ मंडळ (बॉडी) ही बडतर्फ किंवा निलंबीत करणे गरजेचे आहे.

४) जनरल बॉडी मिटींग न घेता किंवा चर्चा न करता. कोणताही ठराव पास न करता संस्थेच्या हिताविरूध्द जावून संस्थेच्या पेशाचा अपव्यय करून त्यामध्ये भष्ट्राचार करून कोरोना काळात गोरगरीब पुजाऱ्यांना किराणा किट दयावयाचे सोडून गर्भश्रीमंत असणाऱ्या लोकांना हे किराणा किट बेकायदेशीरपणे देण्यात आले. छत्र्या वाटप करण्यात आल्या, वह्या वाटप, सि.सी.टि.व्ही कॅमेरे बसवण्यात आले. गरज नसताना फर्निचर करण्यात आले. वीस ते पंचेवीस एल सी.डी. टि.व्ही खरेदी व विश्वस्थांचा प्रवास खर्च करण्यात आले या बाबींवर संस्थेचे लाखो रूपये उधळण्यात आले त्यात भ्रष्टाचार करण्यात आला या बाबीबाबत ठराव नाही,चर्चा नाही, मिटींग नाहीत व सगळयात महत्वाचे म्हणजेच सन्माननीय सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांची परवानगी नाही, त्यामुळे सदरचे विश्वस्थ मंडळाने या सर्व बाबीमध्ये घोटाळा भ्रष्टाचार केलेला असल्यामुळे सदरच्या ११ वर्ष बेकायदेशीर घटनेविरूध्द कारभार करणाऱ्या या विश्वस्थ मंडळास बडतर्फ किंवा निलंबीत करण्यात यावे व त्यांची चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी.

५) साल सन २०१५ मध्ये संस्थेचे जनता सहकारी बँक शाखा तुळजापूर येथे रक्कम रूपये ४५००,०००/- अक्षरी पंचेचाळीस लाख रूपये त्याचे फिक्स डिपॉझिट करणे अत्यंत गरजेचे असताना व ते संस्थेच्या आर्थिक हिताचे असताना हे फिक्स डिपॉझिट करण्यात आलेले नाही ते का करण्यात आले नाही? त्याचे कारण काय? कोणाच्या सांगण्याविरूध्द सदरचे फिक्स डिपॉझिट करण्यात आलेले नाही? त्या मागचा हेतू काय आहे? हे पण आपण चौकशी लावून सदरचे फिक्स डिपॉझिट केले नसल्यास सदर विश्वस्थ मंडळाससंस्थेच्या हिताविरूध्द व आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी योग्य शासन करून सदरच्या विश्वस्थ मंडळास तात्काळ बडतर्फ किवा निलंबीत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

६) भक्तांच्या सोयीसाठी व न्यासाचे उत्पन्न वाढावे या कारणासाठी व न्यासाच्या इमारतीच्या बांधकामासाठी सदर संस्थेने कर्ज घेतलेले होते. परंतु २०१५ पर्यंत पहिल्या विश्वस्थ मंडळाने न्यासाचे मंगल कार्यालय व भक्तनिवास खूप चांगल्या पध्दतीने चालवून भक्तांची व जनतेची सोय करून सदरचे कर्ज फेड़न न्यासाच्या उत्पन्नामध्ये वाढ करून रू.४५,००,००० /- (अक्षरी पंचेचाळीस लाख रूपये) बँकेत शिल्लक म्हणून टाकलेली होती.

७) परंतू त्यानंतर नवीन विश्वस्थ मंडळाने न्यासाचे उत्पन्न वाढविण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही, न्यासाचे मंगल कार्यालय व्यवस्थित चालविले नाही, भक्तांसाठी बांधलेल्या खोल्या भाडयाने जात नाहीत व न्यासाचे भाडयाने दिलेले दुकाने यांचे भाडे वसुली नाही. त्यामध्ये या २०१५ पासून जे विश्वस्थ मंडळाने न्यासाचे खूप मोठे आर्थिक नुकसान केलेले आहे, त्याची आपण चोकशी करून सदरचे विश्वस्थ मंडळ बडतर्फ करण्यात यावे.सदरच्या विश्वस्थ मंडळाने जे पुजाऱ्यांच्या हिताचे कामे करावयास हवे होते ते कोणतेही केलेली नाहीत ते खालीलप्रमाणे.

०१) मासिक बैठक व जनरल बॉडी मिटींग या विश्वस्थ मंडळाने कधीही घेतलेली नाही.

०२) समाजाच्या सभासदांकरिता त्यांना मिळत असलेले भोपे प्रमाणपत्रासाठी कोठेही पाठपुरावा केला नाही. त्यांना ते मिळवून दिले नाही व त्यांची पडताळणीसाठी मदत केलेली नाही.

०३) देवीच्या कुलधर्मकुलाचारामध्ये देवीचे भाविकांकडून ओटभरण विधी हा देवीच्या गाभाऱ्यामध्ये पुजाऱ्यांकडून केला जात होता तो प्रशासनाने रद्द केल्यामुळे पुजाऱ्यांवर अन्याय झालेला आहे. त्यावर या विश्वस्थ मंडळाने काहीही केले नाही.

०४) भक्तांचे अभिषेक पास वाढविण्याची अत्यंत गरजेचे असून या विश्वस्थ मंडळाने प्रशासनावर दबाव टाकून त्यांचेशी चर्चा करून वाढवून घेतले नाहीत, त्यामुळे अनेक भक्त कुलधर्मकुलाचारापासून वंचीत राहतात, त्यासाठी या विश्वस्थ मंडळाने काहीही केलेले नाही.श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ या न्यासाच्या जुन्या जागेबाबत शासनाबरोबर व नगरपालिकेबरोबर अदलाबदलीचा प्रस्तावाचा कोणताही पाठपुरावा केला नाही, तो २०१५ पासून कमिशनर ऑफिस छत्रपती संभाजीनगर येथे पडून आहे, त्यामुळे न्यासाच्या कोटयावधी रूपयांच्या प्रॉपर्टीबद्दल हे विश्वस्थ मंडळ कोणतीही उपाययोजना, पाठपुरावा करीत नाही, त्यामुळे न्यासाचे अतोनात आर्थिक नुकसान झालेले आहे.

न्यासाच्या या संचालक मंडळाने न्यायालयीन दावे जे न्यासाने केलेले आहेत व जे न्यासावर झालेले आहेत त्यामध्ये वकीलांना भेटणे, सल्ला घेणे, त्यांचा पाठपुरावा करणे, न्यासाच्या दाव्यांवर (केसेसवर) लक्ष दिलेले नाही, त्यामुळे विश्वस्थ मंडळ किती निष्काळजीपणे काम करीत आहे हे दृष्टीक्षेपास येते.

०७) तुळजापूरामध्ये खूप मोटी सांस्कतिक कार्यक्रमाची रेलचेल असायची, मोठमोठे नावाजलेले कलाकार येऊन आई तुळजाभवानीस सेवा देत असत ती प्रशासनाने बंद केली ते पुन्हा चालू करण्यासाटी या विश्वस्थ मंडळाने कोणताही पाठपुरावा केला नाही.

०८) श्री तुळजाभवानी मंदिराचा इतिहास व ऐतिहासिक वारसा असणारे हे पवित्र तिर्थक्षेत्र यावर ऐतिहासिक नाटक, पुजाऱ्यांसाठी धार्मिक शिक्षण वर्ग या कार्यक्रमांचे आयोजन कधीही या ११ वर्षात या विश्वस्थ मंडळाने केलेले नाही. तरी माननीय सहाय्यक धर्मादाय आयुक्तांना स्वतः चौकशी करून न्यासाच्या ऑफिसला भेट देवून सर्व न्यासाचे संचिकांचे Inspection करावे व खालील बाबीवर आपण त्याची तपासणी करून जे दोषी आढळतील त्यांचेवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंद करण्याचे आदेश आपण दयावेत असे या निवेदनातून मागणी केली आहे.

१) श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ या न्यासाचा घटनेमध्ये विश्वस्थांचा कार्यकाळ ५ वर्षाचा असताना न्यासाच्या घटनेविरूध्द जावून ११ वर्ष कारभार बेकायदेशीर केल्याबद्दलची चौकशी व्हावी.

२) सन २०१५ ते २०२५ या अकरा वर्षात कोणतीही सभा घेतली नाही, त्याची चौकशी व्हावी.

३) श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ या न्यासाचे सर्व मिटींग रजिस्टर मासिक मिटींग, रजिस्टर, किर्द, खतावणी, जनरल बॉडी मिटींग रजिस्टर डेड स्टॉक रजिस्टर याची आपण स्वतः येऊन त्याची तपासणी करावी ही विनंती.

४) न्यासाचे पैशाची उधळपट्टी करून किराणा वाटप. छत्रया वाटप वहया वाटप, सी.सी.टि.व्ही कॅमेरा. वीस ते पंचेवीस टी.व्ही. एल.सी.डी., फर्निचर प्रवास खर्च यावर लाखो रूपये खर्चुन भ्रष्टाचार केलेला आहे. हे सर्व खर्च करताना सन्माननीय सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांची परवानगी घेतली का? व जर तशी कायदेशीर परवानगी घेतली नसेल तर त्याची चौकशी करून तात्काळ कारवाई या विश्वस्थ मंडळावर करून गुन्हे नोंद करण्याचे आदेश दयावेत.

न्यासाच्या खात्यावर २०१५ साली रोख रू. ४५००,००/- (अक्षरी पंचेचाळीस लाख रूपये) एवढे होते. त्याचे न्यासाच्या हितासाठी फिक्स डिपॉझिट का करण्यात आले नाही? ती रक्कम तशीच सेव्हीग अकाऊंटवर का ठेवण्यात आली. त्यामुळे या ११ वर्षात न्यासाचे खूप मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. त्याची चौकशी करावी.

न्यासाचे मंगल कार्यालय, भक्तांसाठी खोल्या व न्यासाचे दुकानाचे भाडे (उत्पन्न) हे सन २०१५ पर्यंतचे अवलोकन वरील बाबीचे २०१६ ते २०२५ पर्यंतचे अवलोकन मे. साहेबांनी करावे यामध्ये या विश्वस्थ मंडळाने न्यासाचे किती आर्थिक नुकसान केलेले आहे.सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी सर्व बाबींची चोकशी आपण स्वतः श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ (न्यास नोंदणी क्रमांक F-136) या न्यासाच्या कार्यालयात येऊन करावी व आर्थिक बाबीमध्ये जे विश्वस्थ दोषी आढळतील त्यांचेवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश व्हावेत व विश्वस्थांनी न्यासाच्या प्रॉपर्टीबद्दल जे दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे जे नुकसान झालेले आहे, त्याची चौकशी होऊन सदरचे (सध्याचे) विश्वस्थ मंडळ तात्काळ बडतर्फ किंवा निंलवीत करावे असे एका निवेदनाद्वार
किशोर कल्याणराव गंगणे माजी अध्यक्ष श्री तुळजाभवानी पुजारी मंडळ, तुळजापूर यांनी केली आहे.

New Doc 08-29-2025 13.36 निवेदनाची लिंक नक्की पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!