पुण्यातील एका भक्तांनी स्वतःच्या कलाकुसरनुसार बनवीलेले नऊवारी वस्त्र श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी अर्पण

पुण्यातील एका भक्तांनी स्वतःच्या कलाकुसरनुसार बनवीलेले नऊवारी वस्त्र श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी अर्पण

तुळजापूर : प्रतिनिधी

पुणे येथील रहिवाशी देविभक्त साजन लिपाने आणि त्यांच्या पत्नी सौ सलोनी लिपाने यांच्या वतीने दि.२२ ऑगस्ट रोजी शुक्रवार रोजी तुळजापूर निवासिनी आई तुळजाभवानी चरणी त्यांनी बनवलेल्या त्यांच्या साजन ॲड सलोनी ह्या डिझायनर ब्रँड कडून नऊवारी वस्त्र अर्पण करण्यात आले. हे लिपाने दाम्पत्य स्वतः एक डिझायनर असून ते स्वतः आपल्या मागणी नुसार हवे आहेत असे वस्त्र आपल्याला बनवून देतात. लग्नासाठी असू अथवा कुठल्याही शुभ कार्यासाठी ते आपल्या मागणी नुसार (पुरुष/स्त्री) कपडे बनवून देतात. मग ते नवरदेव असू अथवा नवरी वरपिता असू अथवा वरमाई त्यांच्याकडे सर्वांसाठी सर्व प्रकारचे कपडे डिझाइन करून मिळतात. लिपाने परिवाराची बरेच दिवस इच्छा होती की आपण स्वतः आपल्या कुलदैवत तुळजाभवानी साठी एक अगळे वेगळे वस्त्र बनवायची. मग त्यांनी त्यांच्या परिवाराचे पुजारी पुष्कराज शिंदे यांना विचारले असता पुजारी यांनी सुचवले आणि त्या नुसार लिपाने परिवाराने स्वतः च्या डिझायनिंग आयडिया ने कुलदैवत आई श्री तुळजाभवानी मातेस सुबक आणि छान असे नऊवारी वस्त्र अर्पण केले.

     तुळजाभवानी देवीस सुंदर असे वस्त्र नेसवल्याने पुणे येथील कायम चर्चेत असलेले आणि प्रसिद्ध डिझायनर ब्रँड साजन अँड सलोनी यांचे महाराष्ट्रभर कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!