लोकमंगल मल्टीस्टेट को.ऑपरेटीव सोसायटी धाराशिवच्या चेअरमनपदी पंडित लोमटे तर व्हाईस चेअरमनपदी बालाजी शिंदे यांची बिनविरोध निवड
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
लोकमंगल मल्टीस्टेट को.ऑपरेटीव सोसायटीच्या चेअरमनपदी धाराशिवच्या श्री. पंडित गुरुनाथ लोमटे आणि व्हाईस चेअरमनपदी श्री. बालाजी भगवान शिंदे यांची बिनविरोध निवड झाली.
महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातही कार्यरत असलेल्या लोकमंगल मल्टीस्टेट को.ऑप. सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक २०२५ ते २०३० पर्यंत शुक्रवार दि.३० मे २०२५ रोजी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. आणि अकरा संचालक बिनविरोध निवडून आले. संचालक म्हणून
श्री. रोहन देशमुख
श्री. शितल शहाणे
श्री. राजेंद्र अडगळे
श्री. अजय ढोणे
श्री. जयसिंग देशमुख
श्री. पांडुरंग डोलारे
श्री. राजेंद्र पाटील
सौ. अश्विनी रेंगे
सौ. शितल बोरफळे
यांची निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए.आर.ओ. श्री. सदाशिव मधुकर पडदुणे यांनी काम पाहिलं. याप्रसंगी आ. सुभाष(बापू )देशमुख यांनी नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन व समस्त संचालकांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.