पशुवैद्यकीय दवाखाना असून अडचण नसून खोळंबा;खाजगी डॉक्टरांची आर्थिक बुर्दंड सोसेना
बावी (कावलदरा ) गावातील शेतकरी चिंताग्रस्त
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव तालुक्यातील केशेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत अनेक महिन्यांपासून केवळ नियमित वैद्यकीय अधिकारी नसल्याने येथील जनावरांवर योग्य उपचार होत नाही का? . बावी (का) परिसरात पशुवैद्यकीय डॉक्टर कधीच ड्युटीवर हजर नसतात अशा कामचुकार डॉक्टर मुळे पशुधनाचे योग्य उपचार न झाल्यामुळे मृत्यू पावत आहेत डॉक्टर असून अडचण नसून खोळंबा, अशी गत झाली आहे. मात्र योग्य व वळेत उपचार मिळत नसल्यानेच बावी येथील दादा उंडे यांचे जनावरे केवळ दगावली त्यामुळे गावात प्रशासनाविरुद्ध असंतोष निर्माण झाला आहे.
बावी कावलदरा परिसरातील शेतकरी शेतीस पूरक व्यवसाय म्हणून जनावरे पाळतात. परंतू येथे कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने आणि परिसरातील आजारी जनावरांवर उपचार कोण आणि कधी करणार यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे दिसत आहे. त्यामुळे बावी (का ) या ठिकाणी कायमस्वरूपी पशुवैधकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
बावी परिसरात पशुपालक जनावरे पाळायची कि नाही या द्विधा मनस्थिती झाली आहे. केशेगाव येथील दवाखान्याला कंपाउंडर आणि पशुवैद्यकीय अधिकारी असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था निर्माण झाली आहे.
पशुवैद्यकीय अधिकारी हजर नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे व त्यांच्या जनावरांचे हाल सुरु आहेत. अखेर दूर का होईना मात्र खासगी डॉक्टरांकडे जाऊन जनावरांवर उपचार करावे लागतात. त्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
डॉक्टरचा उपचार वेळेवर न मिळाल्याने दूधभाती जनावरे दगावली !
माझी दोन तीन दिवसा पुर्वी गाय मरण पावली ती केवळ गावातील पशुवैद्यकीय डॉक्टर नसल्यानेच. गायीच्या उपचारासाठी खासगी डॉक्टर बोलावले होते ते येण्यास वेळ लागतो तर काही वेळेस दुसऱ्या गावात जातात फोन लागत नाही, अशा सर्व घटना घडत असतात. या दवाखान्यात जर कायमस्वरूपी डॉक्टर असते तर त्या जनावराला वेळेत उपचार मिळाले असते माझे न भरून येणारे नुकसान झाले नसते. गावात नावालाच पशुवैद्यकीय अधिकारी आहेत या डॉक्टराची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे.
दादा परशुराम उंडे,
पशुपालक, बावी (का )
खाजगी डॉक्टरांची आर्थिक लूट ?
गायीचा जीव वाचविण्यासाठी भरपूर पैसे खर्च झाला शिवाय मानसिक त्रास ही सहन करावा लागला.वरून खाजगी डॉक्टरांची आर्थिक बुर्दंड