तुळजापूर एम डी ड्रग्ज प्रकरणी शुभम नेपते नवीन आरोपी अटक
जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम नव्याने ८० लोकांना नोटीस काढणार का ?
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी शुभम नेपते नविन आरोपी अटक करण्यात आली असून, नेपते यास तुळजापूर शुक्रवार पेठ, भोसले गल्लीतून सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्या तामलवाडी पोलीसांनच्या टीमनेत्यास ताब्यात घेतले आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील फरार असलेल्या आरोपीपैकी हा नविन आरोपीस असल्याचे समजले जात आहे तामलवाडी येथील पोलिसांनी बुधवार दि.२८ मे रात्री अटक केली. दरम्यान या प्रकरणी आत्तापर्यंत अटक झालेल्या संशयित आरोपींची संख्या १९ झाली असून, अजून १७ आरोपी फरार आहेत. गेल्या आठ ते पंधरा दिवसात तीन संशयित आरोपींना अटक झाली आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर व पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तामलवाडी पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्याने फरार असलेले इतर आरोपींच्या लवकरच मुसक्या आवळल्या जातील अशी शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पोलिस अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनपूर्वक तपास करत असून एकूण ३७ आरोपी निष्पन्न केले आहेत. त्यामध्ये २६ जणांचा विक्री गटात तर १० जणांचा सेवन गटात समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत एकूण १८ जणांना अटक करण्यात तामलवाडी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील दोषारोपपत्रही न्यायालयात सादर करण्यात आले आहे. नुतन जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ निलेश देशमुख व तामलवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर हे कसून तपास करत आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर ह्या नोटीस बजावलेल्यांना नव्याने ८० जनं नोटीस काढणार का ?
तुळजापूर शहरातील एम डी ड्रग्ज प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख व सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांनी शहरातील ८० जणांना नोटीस बजावल्या होत्या.तसेच ड्रग्ज प्रकरणी राजकीय नेते मंडळींनीजे निवेदन दिले होते अशा नेते मंडळीलाही नोटीस बजावण्यात आल्या होत्या मात्र आता परतनव्याने शहरातील ८० जणांना नोटीस बजवावी आणि कसून चौकशी करून फरार आरोपी ताब्यात घ्यावे अशी मागणी शहरातून व तालुक्यातून नूतन पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्याकडे मागणी जोर धरत आहे.