धाराशिव जिल्ह्यातील मोर्चात सहभागी होणाऱ्या बांधवांसाठी सूचना;नवी मुंबईत राहण्याची व वाहन पार्किंगची सोय
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्या आझाद मैदान, मुंबई येथे आंदोलन होणार आहे. यासाठी धाराशिव जिल्ह्यातून मोठ्या संख्येने बांधव मुंबईत येत आहेत.
मुंबईत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनेक रस्ते बंद असतात व अनेक ठिकाणी वाहतूक वळवली जाते. त्यामुळे मुंबई मध्ये वाहनाने येणे-जाणे करणे व पार्किंग करणे कठीण होणार आहे. त्यात पावसामुळे आणखीनच अडचण निर्माण होऊ शकते.
या सर्व अडचणींना बांधवांना सामोरे जावे लागू नये म्हणून, आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या आदेशान्वये नवी मुंबईत राहण्याची व वाहन पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे.
📍ठिकाण
तेरणा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, सेक्टर १२, नेरूळ, नवी मुंबई
[Google Map Link] (https://maps.app.goo.gl/15wnJwRc9NKYZ6wBA)🚆नेरूळ स्टेशन वरून थेट ट्रेनने आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे उतरून मोर्चाच्या ठिकाणी सहज पोहोचू शकता. त्यामुळे आपला मुंबईतील प्रवास अधिक सोयीस्कर व व्यवस्थित होईल.
📞 संपर्क:
श्री. दादा पवार – 9594654770
श्री. पाटील पी. जे. – 9821368855
श्रीहरी मुंढे – 8169880803🙏 बांधवांनी दिलेल्या ठिकाणी व संपर्कावर अवश्य संपर्क साधावा असे आवाहन आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.