“मनोजदादा तुम आगे बढो” “हम तुम्हारे साथ है” घोषणांनी बावीतील परिसर दणाणला होता.
धाराशिव तालुक्यातील बावी (का) येथील मराठांच्या ताफा मुंबईकडे रवाना
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार आणि ‘एक मराठा लाख मराठा’, ‘मनोजदादा तुम आगे बढो -हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी धाराशिव तालुक्यातील बावी (कावलदरा) येथे वातावरण दणाणून गेले. आरक्षणाच्या मागणीसाठी
मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी दि.२७ ऑगस्ट हजारो मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाले.
आरक्षण मिळेपर्यंत मुंबईतून मागे फिरायचे नाही, असा निर्धार व्यक्त करत बांधवांनी गावोगावी छत्रपती शिवरायांना अभिवादन करून प्रवास सुरू केला.
बावी (का) गावात छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेल्या शेकडो बांधवांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. घोषणाबाजीसह बांधवांना निरोप देण्यासाठी समाजातील ज्येष्ठ नागरिक,
महिला, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनासाठी जोरदार पूर्वतयारी करण्यात आली होती. टेम्पो, ट्रक, जीप, कार तसेच खासगी बसेस बुक करण्यात आल्या.
प्रत्येक वाहनावर लावण्यात आलेले स्टीकर्स व बॅनर्स लक्ष वेधून घेत होते. प्रवासादरम्यान कोणतीही अडचण भासू नये म्हणून बांधवांनी किमान पंधरा दिवस पुरेल इतका शिधा व स्वयंपाक साहित्य सोबत घेतले असून एका मोठ्या वाहनात आचारीसह आवश्यक साहित्य ठेवण्यात आले आहे.दरम्यान, मार्गावर अनेक समाजबांधवांनी चहा-नाश्त्याची व्यवस्था केली.
मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यात सामील होणार आहेत. मुंबई गाठेपर्यंत हा मराठा समाजाचा निर्धार अधिक दृढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
प्रारंभी गावात माजी सरपंच सुहास उंडे यांच्या हस्ते वाहनाचे पूजन करण्यात आले. यावेळी रमेश जाधव, अंबादास जाधव, दत्तात्रय उंडे, महेश पाटील, अशोक तांबे, सुरेश पाटील, विठ्ठल मुळे, किशोर तांबे, ज्ञानेश्वर साळुंके, प्रमोद तांबे, हणमंत उंडे, हर्षद तांबे, इंद्रजीत शिंदे, समाधान तांबे, ज्ञानेश्वर साळुंके, प्रविण तांबे, मच्छिंद्र जाधव, अतिश जाधव यांच्यासह मराठा .समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबईकडे रवाना झालेल्या तरुणांमध्ये हनुमंत तांबे, शरद जाधव, सुधाकर तांबे, विष्णू जाधव, दादा काशिद, कुंडलिक उंडे,महेश जाधव, श्रीकांत महाडिक, वैभव उंडे, रोहन महाडिक, दशरथ मुळे, बापू जाधव, योगेश महाडिक, विष्णू उंडे,लिंबराज साळुंके आदींचा समावेश आहे.