जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व रितु खोकर पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखली
सीना कोळेगाव धरणावर आपत्ती व्यवस्थापन पथकाची रंगीत तालीम.
तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी
धाराशिव चे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व मा.रितु खोकर पोलीस अधिक्षक धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखली व उपस्थितीत डोमगाव ता.परंडा येथे सीना कोळेगाव धरण येथे आपत्ती व्यवस्थापन टीमची रंगीत तालीम(मॉक ड्रिल) घेण्यात आली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वैशाली तेलोरे, उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ, तहसिलदार निलेश काकडे, तहसिलदार जयवंत काकडे, पोनि दिलीपकुमार परेकर पोलीस ठाणे परंडा, सपोनि गोरक्षनाथ खरड पोलीस ठाणे अंबी,सपोनि प्रविण सिरसट पोलीस ठाण परंडा, जिल्हा संधारण अधिकारी पी के महामुनी, गटविकास अधिकारी राउत, तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे, सहा. अभियंता आर बी माने डॉ.साचे यांच्या सह पोलीस विभाग, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.